पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२ रें. ] जर्मनीमधील धर्मसुधारणेची चळवळ. ३३ इच्छा नव्हती असें नाहीं, परंतु धर्माधिकान्यांच्या संमतीनें या सर्व गोष्टी घडवून आणाव्या असें त्यास वाटत होतें. यावेळीं त्याचा इटलीच्या उत्तर- भागी असलेल्या मीलन प्रांतावर डोळा होता व तें संस्थान फान्सच्या मगरमिठींतून सोडविण्याच्या कामी रोममधील पोपची सहानुभूति मिळविणें त्यास फारच इष्ट वाटलें. तेव्हां जर्मनीमधील धार्मिक बाबतींतील कलहाच्या 'प्रसंगीं ल्यूथरचा पक्ष घेतल्यास आपणास रोममधील पोपची अनुकूलता मिळणार नाहीं इतकेंच नव्हे, तर पोपचें संस्थान फ्रान्सच्या वती आपणाशी युद्ध करण्यास उद्युक्त होऊन मिलनचें संस्थान आपणास काबीज करतां यावयाचें नाहीं, असें त्यास वाटत असल्यानें त्यानें ल्यूथरच्या विरुद्ध आपले धोरण ठरवून १५२१ च्या मे महिन्यांत एक पत्रक प्रसिद्ध केलें. या पत्रकामध्यें ल्यूथरचीं सर्व पुस्तकें सरकारजमा करण्याचा हुकूम 'दिलेला असून त्याचें जीवित कायद्याच्या संरक्षणाखालीं नाहीं असें जाहीर केलें होतें. अशाप्रकारें जर्मनीमधील धार्मिक बाबींचा आपण योग्य व * कायमचा निकाल लावला असें वाटून तो इटलीमध्यें फ्रान्सशीं लढण्या- • साठी तत्काळ निघून गेला. परंतु यावेळीं धर्मसुधारणेच्या अवश्यकतेसंबंधी लोकांचीं मनें तयार झाली असल्यानें बादशहाच्या वरील हुकमानें धर्मसुधारणेची चळवळ थांबेल असा रंग दिसत नव्हता. चार्लसनें यावेळी स्वतः जर्मनीमध्ये राहून धर्म- सुधारणेची चळवळ थांबविण्याचा जोरानें प्रयत्न केला असता, तर त्याच्या प्रयत्नास कदाचित् यश आलें असतें; परंतु जर्मनीमधील बरेच संस्थानिक • ल्यूथरच्या बाजूला असल्यामुळे व इटालियन राजकारण अधिक महत्त्वाचें वाटून तो तिकडे निघून गेल्यानें ल्यूथरच्या विरुद्ध काढलेल्या पत्रकाचा कांहींच उपयोग न होतां, ही धर्मसुधारणेची चळवळ अधिकच जोरानें पसरूं लागली.