पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३५१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

• २१. ] युरापियन राष्ट्रांच्या वसाहती व अंकित प्रदेश. ३४९ सरकारनें आपलें अभिवचन पूर्ण केलें नसल्यामुळे, तें अभिवचन पूर्ण करून घेण्यासाठीं व हिंदी लोकांच्या आकांक्षा काय आहेत हैं व्यक्त करण्यासाठी १८८५ सालीं ' राष्ट्रीय सभा ' पहिल्याप्रथम स्थापन करण्यांत आली आज. ३०-३५ वर्षे या राष्ट्रीय सभेनें हिंदी- लोकांच्या आकांक्षा काय आहेत तें व्यक्त केलेलें आहे; व हिंदीलोकांच्या सनदशीर चळवळीचा योग्य तो परिणाम होऊन ता. २० आगष्ट १९१७ रोजी जबाबदार ब्रिटिश मंत्रिमंडळानें हिंदुस्थानांत 'जबाबदार राज्य- पद्धति' स्थापन करण्याचें आपलें धोरण जाहीर करून हिंदुस्थानसंबंधीं प्रत्यक्ष माहिती मिळविण्यासाठीं हिंदुस्थानचे स्टेट सेक्रेटरी माँटेग्यू साहेब यांस हिंदुस्थानांत धाडलें. येथें आल्यावर माँटेग्यू यांनी हिंदी पुढारी व डेप्युटेशन यांच्या मुलाखती घेऊन हिंदुस्थानच्या भावी राज्यघटनेसंबंधीं एक घटना तयार केली. या घटनेबद्दल निरनिराळ्या शिष्टमंडळांच्या व प्रमुख गृहस्थांच्या पार्लमेंट कमिटीपुढें साक्षी झाल्या असून त्यासंबधाचें बिल ब्रिटिश पार्लमेंटनें नुकतेंच मंजूर केलें आहे. या नवीन घटनेप्रमाणें जबाब- दार राज्यपद्धतीची कांहीं खात्यांत सुरुवात होऊन थोड्यांच वर्षांत कॅनडा, आस्ट्रेलिया वगैरे वसाहतींप्रमाणें हिंदुस्थानास जबाबदार राज्य- पद्धतीचे पूर्ण हक्क मिळून हिंदुस्थानची उत्तरोत्तर भरभराट होईल असा भरंवसा वाटतो ! ब्रिटिश साम्राज्याचा असा उत्कर्ष होत असतां गेल्या चाळीस वर्षांपासून वसाहती स्थापन करण्याची लाट युरोपियन राष्ट्रांमध्यें प उद्भूत होऊन त्या दृष्टीने प्रयत्न करण्यांत जर्मनीनें प्रमुख भाग घेतला. गेल्या पांच शतकांमध्यें जर्मनीमध्यें अंतस्थ कलह असून १८७१ पर्यंत जर्मनीचें एक संघटित राष्ट्र झालें नसल्यानें पोर्तुगाल, स्पेन, हॉलंड, फ्रान्स व इंग्लंड वगैरे राष्ट्रांमध्यें वसाहती स्थापन करण्याच्या कामी स्पर्धा सुरू असतां जर्मनीनें त्यामध्यें कोणताच भाग घेतला नव्हता ! परंतु १८८०