पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३४ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण थोडक्याच वेळांत ही धर्मसुधारणेची चळवळ सार्वत्रिक झाली, व जर्मनीमधील कित्येक धर्माधिकान्यांनी पोपशीं असलेला आपला संबंध धर्मसुधारणेची चळवळ सार्वत्रिक होते. सोडून दिल्याचें जाहीर केलें. ठिकठिकाणचे धर्म- मठ मोडण्यांत येऊन चर्चमधील डामडौल कमी करण्यांत आला. पूर्वीच्या लॅटिन भाषेतील प्रार्थने- ऐवजी सर्वांस समजणाऱ्या देशी भाषेतूनच प्रार्थना करण्याचा उपक्रम सुरू झाला. अशाप्रकारें सर्व जर्मनीभर धर्मसुधारणेची लाट पसरत असतां कांहीं माथेफिरू लोकांकडून धर्मसुधारणेच्या नांवाखाल ल्यूथरला असंमत असें आचरण झालें असल्यास त्यांत कांहींच नवल नव्हतें. धर्मसुधारणा हलके हलके सुरू झाल्यास पूर्वीच्या रोमन कॅथलीक पंथांतील वाईट गोष्टी आपोआप नाहींशा होतील असें ल्यूथरला वाटत होतें. परंतु चळवळ्या लोकांना ल्यूथरचें म्हणणें आवडलें नाहीं व मूर्ति फोडणें, चर्चमधील भपकेबाज व ऐषआरामाच्या वस्तूंचा नाश करणें वगैरे गोष्टी करण्याबद्दल ही मंडळी आपल्या अनुयायांस प्रोत्साहन देऊ लागली. अशाप्रकारें धर्मसुधारणेची लाट सार्वत्रिक पसरत असतां जर्मनीच्या दक्षिण व मध्यभागांतील शेतकऱ्यांनी बंड उभारलें. वास्तविक पहातां या बंडाचें कारण धार्मिक नसून सामाजिकच असलेलें आपणास आढळून येतें, कारण गरीब शेतकरी- शेतकऱ्यांचें बंड - १५२४-२५. वर्गावर श्रीमंत जमीनदारवर्गाकडून होत असलेला जुलूम पाहूनच यांनी बंड उभारलें होतें. परंतु त्यावेळेस पसरत चाललेल्या धर्मसुधारणेच्या लाटेचाही या वर्गांनीं फायदा घेतलेला होता. सर्व मनुष्यें एकाच ईश्वराची लेकरें असल्यामुळे सर्वांस सारखे हक्क आहेत वगैरे गोष्टी ल्यूथरनें स्थापिलेल्या धर्मपंथांत आहेत असें जेव्हां त्यांस आढळून आलें तेव्हां आपणास वरिष्ठ वर्गाच्या बरोबरीचे हक्क मिळावेत म्हणून त्यांनी बंड उभारले. यावेळी या शेतकरी वर्गानें चळवळ्या लोकांच्या प्रेरणेनें पुष्कळ अनन्वित कृत्यें केलीं. त्यावेळीं जर्मनींतील बादशाही सत्ता