पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/४०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३८ युरोपचा अर्वाचीन इतिहास. स्टंटपंथीय अनुयायांनी देखील चार्लसशी दोन हात तयारी चालविली. [ प्रकरण करण्याची जर्मनीमध्यें धार्मिक प्रश्नांचा तडजोडीनें निकाल न लागतां युद्ध करण्यापर्यंत मजल येऊन दोन्ही पक्षांमध्यें युद्ध सुरू होण्यापूर्वीच मार्टिन ल्यूथर १५४६ मध्ये मरण पावला. त्यानें आपले मार्टिन ल्यूथरचा मृत्यु १५४६. सर्व आयुष्य साधेपणानें व नम्रतेने काढलेलें होतं. रोमन कॅथलीक धर्मामध्ये अर्वाचीन युगांतील धर्मगुरूंनी घुसडलेले वेडगळ आचारविचार, धर्मगुरूंची धार्मिक बाबीस- धानें दिसून येणारी शिथिलता वगैरे गोष्टी दूर करून ख्रिश्चन धर्म पत्र- प्रमाणे शुद्ध नैतिक पायावर उभा करावा असा त्याचा विचार होता. परंतु - ऐषआरामांत व विलासांत दंग असलेल्या धर्मगुरूंनी व कॅथलीक पंथाच्या अनुयायांनी त्याच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केलें इतकेंच नव्हे तर त्याचे - म्हणणे येन केन प्रकारेण हाणून पाडण्याचा निश्चय करून त्यास धर्म- बहिष्कृत करण्याचें ठरविल्यामुळे त्यास नाइलाजास्तव नवीनच धर्मपंथ • स्थापन करावा लागला. जर्मनीमधील संस्थानिकांत या धार्मिक युद्धासंबंधानें दुफळी उत्पन्न होऊन कित्येकांनीं ल्यूथरचा तर कित्येकांनीं बादशहा ५ वा चार्लस याचा पक्ष स्वीकारला. परंतु युद्धाच्या सुरवातीस बादशहाचाच पक्ष प्रबळ असल्यामुळे बादशहाला जय मिळाला व महलबर्गच्या लढाईत प्रॉटेस्टंट पंथाचा कट्टा जर्मनीमधील पहिले धर्मयुद्ध. अनुयायी जो सॅक्सनीचा संस्थानिक त्यास कैद करण्यांत आलें. परंतु या वेळीं या सॅक्सनीच्या संस्थानिकाचा नातलग • मॅरीस यानें चार्लसला पुष्कळ मदत केल्यामुळेंच त्यास ही गोष्ट साध्य करतां आली, म्हणून चालसनें मॅरीसला नुकतेंच जिंकलेलें सॅक्सनी- चें संस्थान बक्षीस दिलें. हें संस्थान बक्षीस मिळाल्यावर आपला प्रति- स्पर्धी जो सॅक्सनचा संस्थानिक त्याचा पूर्ण पाडाव झाला आहे हैं