पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/५४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५२ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण व स्पेनचा अकल्पित रीतीनें पराभव झाला ! फिलीपच्या पराभवामुळे कॅथलिक पंथाचाच युरोपमध्ये पराभव झाल्यासारखें होऊन प्रॉटेस्टंट पंथा- चाच सर्वत्र विजय झाला ! स्पेनचे लष्करी वर्चस्व ३ या फिलीप- च्या कारकीर्दीत संपुष्टांत आलें व स्पेनच्या आरमाराच्या पराभवामुळे, स्पेनच्या आरमारी सत्तेचा -हास होऊन स्पेनची जागा इंग्लंडने घेतली. परंतु फिलीपला युरोपमधील प्रॉटेस्टंट पंथीय चळवळीकडेच आपलें सर्व लक्ष द्यावयाचें होतें असें नव्हे, तर पूर्व युरोपमधील आटोमन टर्कीच्या विस्तृत पावणाऱ्या सत्तेस आळा घालण्या- २रा फिलीप व टर्की. साठीं त्यास प्रयत्न करावयाचा होता. यावेळी टर्क लोकांनी व्हेनिसच्या राज्याचे प्रांत बळका- वण्यास प्रारंभ केला असून हंगेरी प्रांतांतून जर्मनीकडे आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा त्यांचा बेत होता. टर्क लोकांप्रमाणेंच उत्तर आफ्रिकेच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या महंमदीधर्मीय मूरलोकांनीं स्पेनच्या किनाऱ्यावर चांचेगिरी चालविली होती. तेव्हां टर्कीींचा व मूरलोकांच्या वाढणा- या सत्तेचा प्रतिकार करण्यासाठी १५७१ मध्ये पोप, व्हेनीस राष्ट्र, व स्पेन या तिघांनीं आपसांत तह केला; व याच वर्षी फिलीपचा भाऊ डॉन जॉन यानें ग्रीसमधील लेपॅन्टोच्या आखातांत टर्कीच्या आरमाराचा पूर्णपणे पराभव केला. या युद्धामध्ये झालेल्या पराभवामुळें टर्कीींची आरमारी सत्ता पूर्णपणे संपुष्टांत आली असें म्हणण्यास हरकत नाहीं. याखेरीज फिलीपच्या अमदानींतील मोठी महत्त्वाची गोष्ट म्हटली म्हणजे पोर्टुगालचें राज्य स्पेनच्या राज्यास जोडलें जाणें ही होय. १५८० मध्ये पोर्तुगालचा राजा मरण पावल्यावर पोर्तुगालच्या राज्या- वर आपला अधिक हक्क आहे असें फिलीप म्हणूं लागला; व त्यानें ते राज्य एकदम बळकावून त्या राष्ट्राच्या वसाहतीही आपल्या साम्राज्यांत सामील करून घेतल्या. फिलीपच्या या कृत्याचा पोर्ट- गॉलमधील देशभक्तांस तिटकारा वाटत होता, परंतु स्पेनविरुद्ध शस्त्र