पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/६३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५ वें. .] ट्यूडर घराण्याच्या अमदानींतील इंग्लंड. ६१ तेव्हां सर्वांस धाक बसून आपल्या सत्तेविरुद्ध कोणीही काढू नये म्हणून हेन्रीनें आपली धार्मिक बाबतींत सत्ता न जुमानल्याबद्दल धर्माधिकारी फिशर व सर थॉमस मूर यांना फांशीं दिलें. पोपचें इंग्लंडवर असलेले धार्मिक वर्चस्व नष्ट झाल्यानंतर हेन्री- कडून प्रॉटेस्टंट पंथाचा पुरस्कार होईल असें सर्वास वाटल्यास त्यांत कांहींच आश्चर्य नव्हतें. हेन्रीला सल्ला मसलत देणारा क्रॉमवेल याचा प्रॉटेस्टंट पंथाकडेच ओढा असल्यामुळे हलके हलके पूर्वीच्या रोमन कॅथलीक पंथांतल्या पुष्कळ गोष्टी कमी करण्यांत आल्या; इंग्लंडमधील सर्व चर्चमधून इंग्लिश भाषेतील बायबल उपयोगांत येऊ लागलें. पातकाबद्दल प्रायश्चित्त घेण्याची पद्धत बंद करण्यांत येऊन जत्रा, दैविक चमत्कारांचे खूळ नाहींसें करण्यांत आलें. यानंतर इंग्लंडमधील धर्मम मोडून टाकण्यांत येऊन त्यांच्या जमिनी सरकारजप्त करण्यांत आल्या. हेन्री गादीवर आला त्यावेळी इंग्लडमध्यें हजारावर धर्ममठ होते; या धर्ममठांकडून पूर्वीप्रमाणें सार्वजनिक उपयोगा- चीं कृत्यें होत नसून तेथें रहाणारे जोगी आळशी, निरुद्योगी व व्यसनी झालेले होते; व आज. इतकी वर्षे धर्मभोळ्या लोकांनी अर्पण केलेल्या संपत्तीनें हे धर्ममठ बरेच संपन्न झालेले होते. हे धर्ममठ मोडून टाकून तेथील जमिनी व चीजवस्त सर- कारजप्त केल्यास सरकारास बरीच संपत्ति अनायासें मिळेल, असें वाटल्या- वरून हेन्रीनें त्या जमिनी व तेथील मालमत्ता सरकारजप्त करण्याचा कायदा १५३६ मध्यें पार्लमेंटकडून पास करून घेतला. धर्ममठ मोडण्यांत येतात- १५३६. हे अशाप्रकारें रोमन कॅथलीक पंथाविरुद्ध मोहीम चालविलेली पाहून इंग्लंडच्या उत्तरभागामध्यें रहाणाऱ्या धर्मवेड्या लोकांस त्वेष आला व त्यांनीं बंड उभारलें ( १५३६ ). तें बंड मोडून टाकण्यास स फार वेळ लागला नाहीं. परंतु या बंडापासून धडा घेऊन आतां यापुढें धार्मिक बाबतींत कांहीं फेरफार न करण्याचें त्यानें ठरविलें इतकेंच (