पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/७२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७० लहानगी मेरी. युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण च्या गादीची वारस कायती लहानगी मेरीच होती. ती अगदींच लहान असल्यामुळे, 'गाईझ' या घराण्यांतील तिच्या आईनें राज्यकारभाराची सर्व सूत्रे आपल्या हातांत घेऊन मरेला शिक्षणासाठी फान्समध्ये पाठवून दिलें. तेथें असतांना फ्रान्सच्या ज्येष्ठ, राजपुत्राशीं तिचें लग्न झालें इकडे, मेरीच्या आईच्या हातांत कारभारांची सर्व सूत्रे असतां, स्कॉट- लंडमध्ये त्यावेळी प्रसार होत चाललेल्या कॅल्व्हीनच्या प्रॉटेस्टंट धर्मपंथाशीं तिला झगडावें लागलें. ती स्वतः रोमन कॅथलीक पंथाची कट्टी अनुयायी असल्यानें स्कॉटलंडमध्यें प्रॉटेस्टंट पंथाचा प्रसार होणें तिला आवडलें नाहीं. परंतु जॉन नाक्स याच्या प्रेरणेनें स्कॉटलंडमध्यें प्रॉटेस्टंट पंथाचा तर जारीनें प्रसार होत होता तेव्हां त्यास अडथळा स्कॉटलंडमध्ये प्रोटेस्टंट पंथ प्रस्थापित होत १५६०. आणण्यासाठीं तिला कडक उपाय योजणें भाग 'पडलें. तिनें यावेळीं स्कॉटलंडमधील प्रॉटेस्टंटपंथाची बंडाळी मोडून टाकण्या- साठीं आपल्या मदतीस फ्रेंच सैन्य बोलाविलें होतें, परंतु स्कॉटलंडच्या प्रॉटेस्टंटपंथीयांस इंग्लंडची मदत मिळाल्यामुळें मेरीच्या आईचा पराभव होऊन तिला १५६० मध्ये एडिंबरो शहरी तह करणे भाग पडलें; अशा प्रकारें प्रॉटेस्टंटपंथीय व रोमन कॅथलीकपंथीय स्कॉच लोक यांच्यामध्ये तह होऊन फार दिवस झाले नाहींत तोंच ती मरण पावली. यावेळीं तिची मुलगी मेरी फ्रान्समध्यें होती, तेव्हां सरदार लोकांनीं सर्व सत्ता आपल्या हातीं घेऊन स्कॉटिश पार्लमेंटच्या संमतीनें स्कॉटलंडचा धर्मपंथ प्रेसबिटेरियन ( कॅल्व्हीनचा धर्मपंथ ) असल्याचे जाहीर केलें ( १५६० ). इकडे फ्रान्सचा राजपुत्र फॅन्सीस याच्याशीं तिचा विवाह झाला होता व १५५९ सालीं ती आपल्या पतीबरोबर ( २ रा फॅन्सीस ) फ्रान्स-