पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/८०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७८ युरोपचा अवाचीन इतिहास. [ प्रकरण मार्गरेट ही न्यायी व धोरणी असल्यानें नेदर्लंडची व्यवस्था नीट राहून तेथील जुलमी व अन्यायी कृत्यें बंद होतील असें वाटत होतें; परंतु तिच्या सल्लागार मंडळांत धर्मवेडया स्पॅनिश अमीरउमरावांचा भरणा असल्यानें मार्गारेटला आपल्या मताप्रमाणें कांहींच करतां येईना ! या सरदार लोकांबद्दल नेदर्लंड- मधील जनतेस अर्थातच तिटकारा वाटे. नेदर्लंड- नेदर्लंडमधील अस्वस्यता. मधील स्थायिक झालेलें स्पॅनिश सैन्य व धर्मकोर्टाकडून करण्यांत येणा अनन्वित कृत्यें पाहून तेथील जनतेचें मन खवळूनच गेलें ! वुइल्यम ऑफ ऑरेंज व सरदार डागमाँट यांच्या नेतृत्वाखाली बंड करण्याचा तेथील जनतेनें निश्चयच केला ! १५५६ मध्यें नेदर्लंडमधील जुलमी धर्म- कोर्टाचे उच्चाटण करण्यासाठीं एक मंडळ स्थापण्यांत आलें ! १५५६ मध्यें एप्रिलच्या पांचव्या तारखेस धर्मकोर्ट बंद करण्यांत यावें अशा प्रकारचा विनंतिअर्ज घेऊन हे मंडळ ब्रुसेल्स शहरीं दाखल झालें. तेथें गेल्यावर मार्गारेटच्या मंत्रिमंडळांतील एका स्पॅनिश सरदारानें उद्दामपणें व तिरस्कारानें 'भिकारी' या नांवानें संबोधिलें असल्यामुळें त्यांनी चिडून जाऊन “ भिकारी संघ " असेंच आपल्या संघाचें नांव ठेवलें. १५६६ मधील दंगा. 'भिकारी संघ' असे नामाभिधान घेणाऱ्या तीनशें मंडळीस हलके हलके नेदर्लंडमधील बरेच लोक येऊन मिळू लागले. त्या सर्वोस आतां आपल्या राज्यकर्त्यांची जुलमी सत्ता उलथून पाडण्याची वेळ आली आहे असें वाटून त्यांनीं दंगा करण्यास प्रारंभ केला. रोमन कॅथलीक पंथाच्या देवळावर हल्ला करून, त्यांनी तेथील सुंदर वस्तु, साधूंच्या मूर्ती, सुबक चित्रें, वगैरे कितीतरी वस्तूंचा विध्वंस केला. हा दंगा नाहींसा करून पुन्हा सर्वत्र स्थिरस्थावरता करण्यास मार्गारेट व तिचें मंत्रिमंडळ यांना किती- तरी दिवस घालवावे लागले !