पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/९२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९० युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण राज्यकारभाराची सर्व सूत्रें मेरीचे मामा फॅन्सीस व लॉरेन या गाईझ घराण्यांतील दोन सरदारांच्या हातांत गेलीं. देशांत अशा प्रकारचा गोंधळ चाललेला पाहून प्रॉटेस्टंट पंथीय लोकांनी धार्मिक बाबीप्रमाणेंच राजकीय बाबीमध्येही लक्ष घालण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या फॅन्सिसच्या अमदानीतील गोंधळ. फ्रान्सचा राजा अल्पवयी असून राज्यकारभाराचीं सर्व सूत्रे गाईझ घराण्यांतील दोन पुरुषांच्या हातांत गेलेली पहातांच फ्रान्समधील अमीर- उमरावांस व राजघराण्याशी संबंध असलेल्या लोकांस त्यांच्याविषयीं मत्सर वाटूं लागावा यांत कांहींच नवल नव्हतें. २ या फॅन्सीसची आई कॅथराईन डी मेडीसी हिला सर्व सत्ता आपल्या हातांत ठेवण्याची महत्त्वा- कॅथराईन डी भेडीसी. कांक्षा उत्पन्न झाली, इतकेंच नव्हे तर तिच्याकडून त्या दिशेने प्रयत्न होऊं लागले. कॅथराईन ही फार खोल विचाराची व कपटानें आचरण कर- णारी महत्त्वाकांक्षी स्त्री असल्यामुळे तिच्या हातांत सर्व सूत्रे जातात कीं काय असें वाटूं लागलें होतें. परंतु यावेळीं फ्रान्सच्या राजघराण्याशीं संबंध असलेल्या बोरवोन घराण्याच्या महत्त्वाकांक्षी पुरुषांनी देखील त्याच दिशेनें प्रयत्न चालविले असल्यामुळे कॅथराईनच्या मार्गात अडथळा आला. बोरबोन घराण्यांतील नॅव्हरीचा राजा ( फ्रान्स व स्पेन यांच्या सरहद्दीवर नॅव्हरीचें एक बारकेंसें संस्थान होतें) अॅन्थनी, व कोण्डेचा राजपुत्र लुई या दोघांना वाटू लागलें की फ्रान्सच्या राज्यव्यवस्थेंत हात घाल- ण्याचा गाईझ घराण्यांतील पुरुषांपेक्षां आपलाच हक्क अधिक आहे. अशाप्रकारें त्यास वाटत असतां बोरवोन घराण्यां- तील पुरुष. गाईझ घराण्यांतील पुरुषांकडून आपणास राज्य- कारभाराच्या व्यवस्थेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होत आहे हें त्यांच्या लक्षांत येतांच त्यांनीं त्या घराण्याविरुद्ध कट रचून, त्या घराण्यांविरुद्ध असलेल्या सर्व मंडळींस आपल्या कटांत सामील करून घेण्याचा प्रयत्न