पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/5

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


(४) नाटककार खाडिलकरः / ५३ ते ७१
 मूल्यमापनात सरभेसळ- समकालीन राजकारणाचे संदर्भ- बांधीव कथाकथन- वाङ्मयीन भूमिकेवर भर- तत्कालीन वातावरण व संदर्भ- संगीत मानापमान- नवा प्रकाश- स्वयंवराकडे पाहण्याची चुकीची दिशा- विद्याहरण- अयशस्वी नाटक- वालंची शुद्ध कलावादी भूमिका- ऐतिहासिक नाटकात नवनिर्मितीची शक्यता- केशवशास्त्री या पात्रावर आक्षेप- मतभेदाचे मुद्दे- शेवटचे प्रवेश का कोसळतात? कादंबरी व नाटक यांतील फरक- भाऊबंदकीतला संघर्ष हेरता आला नाही- विचारनाट्ये व ठसकेबाज कारकाने- विनोदनिर्मितीसाठी खलपुरुषांचा वापर- भडक नाट्याकडे आरंभापासून ओढा- माझी तक्रार.

(५) नाटककार गडकरी : एक आकलन / ७२ ते ८७
 समीक्षकांना पुरून उरलेला विषय- प्रभावशाली पूर्वपरंपरेचा संदर्भ- कोल्हटकरांचे शिष्यत्व हे दोषांचे कारण- खाडिलकरांचा प्रभाव- खांडेकरांनी दाखवलेले दोष- वा.ल. कुलकर्णी यांचे आक्षेप- हा मेलोड्रामा किंवा फार्स नव्हे- खलनायक- गडकऱ्यांना उत्तम जमणाऱ्या गोष्टी– एकच प्याला ही शोकात्मिका- क्षीरसागरांची भूमिका- विनोदाचे स्थान.

(६) पु. ल. देशपांडे । ८८ ते ९७
 चौरस- पुलंच्या भोवतीचे कुंपण- गौरव हाच शत्रू- पु. ल. हे पु. ल. होण्याचे टाळत आहेत- शिष्टाचाराच्या विळख्यातले गुदमरणे हाच विनोद- दुःखाचे चित्रण- तुझे आहे तुजपाशी- आचार्य- काकाजी- उषा आणि गीता- विनोदी नाटक पण गंभीर कथानक.

(७) तुझे आहे तुजपाशी / ९८ ते १२८
 हौशी रंगभूमी- तप्त राजकीय वातावरण- औदार्य आणि समंजसपणा- रचनातंत्र- अर्धविरामावर थांबणारे कथानक- गांधीवादाचे विडंबन हा समज चूक- ही खेळकर सुखात्मिका नव्हे- समीक्षकांची मोजपट्टी चुकीची- आचार्यांचे व्यक्तिमत्त्व व चरित्र- आचार्यांचा दोष- मधूनमधून सामान्य माणूस म्हणून जगावे ही इच्छा- डॉ. सतीश- एकनिष्ठ प्रेमवीर- उषा आणि गीता-

(४)