या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रमानाटक.

जबाब देईन कीं, लग्न झाल्या दिवसापासून तूं कांही मला खायला किंवा चोळीलुगडं वगैरे कां- हींच दिलं नाहींस. त्यांतून घरांत कोणत्याही प्रका- रानं सुख लागत नाहीं; तेव्हां तुझ्या घरी राहून तरी काय उपयोग ! बरं, इतका प्रकार करायला आपल्या मनासारखा आधार देणारा तरी कोण आहे? (विचार करून) हो गडे बरी आठवण झाली. ते दिवाणखान्यांत राहणारे कृष्णराव फार चांग- ल्या स्वभावाचे दिसतात. त्यांची माझी जरी फा- रशी नजरानजर नाहीं तरी ते संभावित दिसतात. तेव्हां त्यांच्या विषयीं आठ पंधरा दिवस बारीक रीतीनं तपास करावा ह्मणजे बरं. आलाच योगा- योग तर फार चांगलं होईल. कारण त्या पुरुषा- ला मी आज चार दिवसांपासून पाहतें, तर तो महा थोर दिसतो. असो, आतां देवाचा योगायोग असल्यास ही गोष्ट फारच चांगली होईल. (असे बोलून निघून जाते. ).