या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४
रमानाटक.

र०- असा प्रकार करणं आपल्याकडं आहे.
कृ० - पाहतां येईल. जाऊं मी आतां ?
र०- परत येणं केव्हां होईल ?
कृ०– संध्याकाळी सहा वाजतां.
र० – मला किनई घटकाभरसुद्धां चैन पडत नाही काय करूं ? (निरुपायामुळे) आतां तुझी जा. पण मी या खिडकीत अगदर्दी वाट पहात बसेन.रोज तर बपतच होतें, त्यांतून आज - ( थांबते )
कं० – ( हंसून ) आज काय झाले ?
र० – ( गळ्या मिठी मारून ) मनासारखं.
कृ० हं: ठीक आहे तर ( एकमेकांचे चुंबन घेतात. कृष्णराव निघून जातो, सखु हे आडून पहाते. )
२० – ( त्याकडे पहात स्तब्ध राहते नंतर. ) काय बाई मन तरी आहे. किती थोरपणाचे पोक्त विचार आतां माझी सगळी काळजी दूर झाली.आई जरी रागावली तरी चिंता नाहीं, नवऱ्यालाही सो- डून देईन आणखी राहीन यांच्याजवळ. (इतक्यां त रमेची आई येते.)
स०-रमे काय करतेस तूं तिथं ?
र०– कांहीं नाहीं उगीच उभी आहे.
स० – असले भलते नाद माझ्या नाहींहो कामास पडायचे.
र० – ( रागावून. ) काय झालंग. कां उगीच त्रास देतेस ?
स० - रागावयला काय झालं ! द्वाड कुठली !