या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६
रमानाटक.
प्रवेश ५ वा.
देवजी, सकु.

देवजी -- (रागानें ) अरेरे! ही गरिबी किती वाईट आहे! मला कामधंदा नाहीं व जवळ पैसा नाहीं त्यामुळे घरांतला त्रास, आणि तोही आजपर्यंत सहन केला परंतु माझी बायको वाईट चालीची निवाली ह्या गोष्टीचें फार दुःख वाटते काय करूं बोभाटा करावा तर आपली अब्रु जाते. बरें! उगीच बसावें तर हा प्रकार दिवसेंदिवस ज्यास्तच वाढत जाईल. तेव्हां तर्सेही करून उपयोगी नाहीं. ( विचार करून.) आतां मामीला हे सांगावें म्हण णजे ती बंदोबस्त करील. इतकेंही करून जर ती न ऐकेल तर त्या रांडेची खोड मोडायला काय उशीर. त्या कृष्णरावालाही हात दाखविल्या- वांचून राहणार नाहीं. माझ्याशी गोड गोड बो- लतो आणि मनांत काळा पात ना ? असो, चिंता नाहीं, (असें बोलून घरांत हांक मारतो) मामी जरा इकडे बाहेर या पाहूं.
स०-कांहो! काय आहे ?
दे० – थोडें काम आहे.
स० – बोला काय तें.
दे० – ( रागानें ) बोलायचें काय! ज्या गोष्टी होतात त्या चांगल्या आहेत ना ?