या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४४
रमानाटक.
प्रवेश ९.
रमा.

र०- (मनाशीं) किती वाई प्रयत्न करतात पण कामा- काजाचं कुठंच जमत नाहीं. जिवाला चैन पडत नाहीं तापयेत आहे. शरिरानं अगदीच खराब झालेत, ए- खादे वेळी त्यांच्या घराकडल्या माणसानी पाहिलं तर ह्मणतील, रांडेच्या नादीलागून काय अवस्था झाली. नकोग बाई, अशानं कसं चालेल तिकड चा जिव सुखी आहे तरच आमची हौस, नाहीं तर काय उपयोग ( विचार करून ) आतां घरीं आले ह्मणजे तुप साखर आणायला सांगतें आणखी रोज खायला लाई करून ठेवतें, ह्मणजे त्यानं कां- हीं तरी बरं वाटेल. सकाळी पोरीं करितां जे पावशेर दुध घ्यायचं ते आधशेर घ्यावं ह्मणजे पाव- शेर त्याना होईल. जेव्हां सांगावं तेव्हां पैशा- ची अडचण सांगायची तर मी आतां ऐकणारच नाहीं. मी आपली एक वेळ जेवीन परंतु तुम च्या शरिराला सुख लागण्या करितां लाडू कराय चें आहेत असं साफ सांगेन त्याशिवाय काही शरिर सुधरणार नाहीं काय करायच पैसाला.

( इतक्यांत सकु येते )

सकु – रमा काय करतीसग