या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रमा नाटक.
स्थळ सोलापुर शहर.
कृष्णाजीपंताचा बसण्याचा दिवाणखाना.
कृष्णाजीपंत व बळवंतराव

कृष्णाजीपंत – (मनाशीं) काय करावें? उद्योगाकडे बि लकुल लक्ष लागत नाहीं. आणि तो जर न करावा तर घरांत फार जाच होतो. बरें, घर सोडून परदेशी जावें तर तिकडे फार दिवस राहिल्यानें कंटाळा ये- ऊन परत घरी केव्हां जाईन अर्से होते. येथेंच नो- करी करून राहवें तर ताबेदारी होण्याची मारामार. त्यांतून आतांच्या सावकारी नोकऱ्या ह्मणजे शुद्ध हमालीप्रमाणे आहेत. सदोदित मालकाची हांजी - हांजी करावी लागते आणि कदाचित् तीही पत्कर- रली असती, परंतु पगार थोडा त्यामुळे अगदर्दी लक्ष लागत नाहीं. सरकारी नोकरीविषयीं तर नांवच काढायला नको. कारण, हल्ली इंग्रेजी शिकलेल्यां नामुद्धां वशिला लागतो, मग आपल्याला तर इंग्रे- जीचा अभाव.( स्तब्ध राहतो) कांही विचार सुचत नाहीं. अकल अगदी गुंगून गेली.परवां बळवंतरावसुद्धां रागे भरला, पण करूं काय काहीं- च उपाय चालत नाहीं. (विचार करून) हो, बरी