या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रमानाटक

.

रा० -- परंतु तिच्याशी बोलावं कोणी ?
गो०- - ती नको काळजी, त्या राधाचाईची आणि तिची चांगली ओळख आहे; तर तिच्या कडून हें . काम करावें.
रा० -- पहा बोवा, आपण तर अगदी तिच्यासाठीं वेडे होऊन गेलो आहोंत, बिलकुल चैन पडत नाहीं.
गो०- - तें काम आपले, तिच्या आईला राधाबाईक- डून वळीवले ह्मणजे झाले की नाहीं.
रा० -- मग तर काय बोलायला नको.
गो०-- मीही फार दिवस तिला पहाती पण काय करावे!
रा० -- कां बरें ? काय झाले ?
गो०-- अहो दोन तीन वेळां प्रयत्न केला, परंतु ति- चे मन कृष्णरावावर असल्याकारणानें आझाला वाटाण्याचा अक्षता मिळाल्या.
रा० -- चिता नाहीं, एकड़ां प्रयत्न तर करून पाहू. पैशाची लालुच फार कठीण आहे.
गो०- - अमूंद्या हो. शिवरामपंताने तिला एकह- जाराचे दागिने देतों ह्मणून सांगितले होते; परंतु तिने ऐकले नाहीं.
रा० -- असेल ! परंतु आतां कृष्णरावाचे फार हाल आहेत, अशामुळे लौकर वश होईल.
गो० --बरें आहे तर, प्रयत्न करून पाहूं.
रा० -- चला तर, आपण राधाबाईच्या घरी जाऊं.
गां.० --चला तर. ( निघून जातात. )