या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लागल है तो पुन्हा विसरतो. नाहीतर त्याला नटाला आस्वाद शक्य आहे असे मानणे भाग होते.
 ज्यांना नैय्यायिकांचे सहप्रवासी म्हणता येईल असे अजून काही विचारवंत रसाचा विचार करीत होते असे अभिनव भारती व लोचनातील उल्लेखावरून दिसते. हया विचारवंताची नावेही उपलब्ध नाहीत. विस्ताराने विचार करता येईल ह्या प्रमाणात त्यांचे विवेचनही उपलब्ध नाही. फक्त ह्या मंडळींच्या काही कल्पना तेवढ्या उपलब्ध आहेत. त्यांपैकी एक कल्पना चित्रतुरगन्यायाची आहे. हा चित्र-तुरग-न्याय बौद्धांचा प्रसिद्ध न्याय होता. म्हणून ह्या विचारवंतांत जर काही बौद्ध असतील तर ते स्वाभाविक म्हटले पाहिजे. हेमचंद्राने शंकुक चित्र-तुरग-न्याय, मानत होता असा उल्लेख केला आहे. शंकुकाच्या विवेचनात चित्र-तुरग-न्याय नेमका कुठे बसतो हे सांगता येणे कठीण आहे. पण अभिनव गुप्तांनी ह्या मडळींच्या काही कल्पना शंकुकाहून वेगळ्या उल्लेखिलेल्या आहेत. चित्रतुरग न्यायाची कल्पना अशी आहे. आपण जेव्हा घोड्याचे चित्र पाहातो तेव्हा नेमके काय दिसते? आपल्या समोर घोडा नसतोच. फक्त रंग व रेषा असतात पण ह्या रंग व रेषांनी घोड्याचा बोध होतो. घोड्याची निर्मिती होते. हा प्रकार नाटयात असतो. नाटय प्रतीती चित्रतुरग न्यायासारखी असते. ही कल्पना मध्यवर्ती गृहीत धरून रस व्यवस्थेची निरनिराळी स्पष्टीकरणे करता येतात. एक स्पष्टीकरण असे आहे की, विभाव, अनुभाव, व्यभिचारी ही सामग्री निरनिराळ्या रंगांच्या सारखी आहे. चित्रात रंगाचा संयोग घोडा व्यक्त करतो. असा विभावादींनी व्यक्त केलेला स्थायीभाव म्हणजे रस ह्या कल्पनेचे प्रमुख वैशिष्ट्य, हयात आहे की अनुकल्च घटक आणि अनुकरणाचे घटक यांचा कोणताही निश्चित असा संबंध नसतो. उदा. घोड्याचे चित्र काढताना पायाचे अनुकरण कसे, शेपटीचे अनुकरण कसे असावे असे प्रश्न उपस्थित होत नाहीत. घोड्यामध्ये असणारे सर्वच घटक उदा. रक्त, मांस, स्नायू ह्यांचे अनुकरण करावे लागत नाही. प्रत्यक्षातल्या घोड्याचा आकार अगर रंग काहीच बंधनकारक नसते. असे चित्र काढण्यासाठी विशिष्ट अश्वच पहावा लागतो असे नाही आणि चित्र पाहातांना आपल्याला विशिष्ट अश्वच प्रतीत होतो असेही नाही. तरीही रंग आणि रेषा घोड्याचा बोध करून देतातच. हाच विभावादी सामग्रीचा आणि अनुकार्याचा संबंध असतो. अनुकरणरूप नाटयातील एक घटक उदा. देखावा अशोकवन-सदृश असण्याची गरज नाही. सीतेसदृश नटी असण्याची गरज नाही. आणि सीता हया विशिष्ट व्यक्तीने शोक नेमका कसा केला हे कळण्याचीही गरज नाही. विभाव अनुभाव संचारीभाव हे एकूण घटक मिळून स्थायीभाव व्यक्त करतात. तो रस आहे. हे चित्र तुरग न्यायाचे, अनुमान-विलक्षण, अनुमान असते.
 ह्या मांडणीमुळे विशिष्टाच्या अनुकरणाचा प्रश्न ( म्हणजे अपरिचितांचे अनुकरण


६६