पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1174

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

cotton goods bleached or unbleached for common use देशांत तयार होणारा माल m-जिन्नस m. D. n. (obs.) कुटुम्ब n. Domes'tically adv. घरगुती-खासगीरीतीने. २ गृहकृत्यासंबंधाने. Domes'ticate v. t. to make domestic, to habituate to home life (ला) घरची संवय लावणे. २ to cause to be, as it were, of one's family or country आपल्याच घरचा किंवा देशातील म्हणून ग्रहण-स्वीकार करणे, आपल्या घरांत किंवा देशांत चालू-सुरू करणे, स्वदेशी-स्वकुटम्बीय करणे, आपला-आपलासा-आपलीशी करणे; as, "To D. a foreign custom or word.” 3 to tame or reclaim from a wild state माणसाळवणे, जंगली स्थितीतून बाहेर आणणे. Domes'tica'ted a. माणसाळवलेला, पाळाव, घरसंवयीचा, माणसाळलेला. Domes'tica'tion n. माणसळवणे n, जंगली प्राण्यांना माणसाळवण्याची क्रिया f. Domes'tica'tor n. माणसळवणारा m. Domestic'ity n. घरगुतीपणा m. N. B.-DOMESTIC ARCHITECTURE: गृहादिइमारतशास्त्र n, वास्तुशास्त्र n. DOMESTIC ECONOMY प्रापंचिक मितव्ययाचा तत्वे n. pl. DOMESTIC DUTIES घरकाम n, गृहकर्म n (S.) गृहकृत्य n-कार्य n. (S.) DOMESTIC SQUABBLING गृहकलह m-भेद m, यादवी f. Domicile, Domicil (dom'-i-sil or sil) [O. Fr. domicile-L. domus, a house.] n. a place of permanent residence वसति-निवास-स्थान n, कायमचा राहण्याची जागा f, ठिकाण n. २ law. a residence an a particular place accompanied with an intention to remain there for an unlimited time कोणत्याही एका विवक्षित ठिकाणी तेथेच कायमचे राहण्याचे बुद्धीने केलेला वास m- घर n, (कायमचे) घर करून राहणे n. ३ com, the place at which a bill of exchange is made payable ज्या ठिकाणी हुंडी लागू करावयाची ती जागा f. D. v.t. एखाद्या ठिकाणी कायमची वस्ती करावयास लावणे. Dominant (dom'-i-nant ) [L. dominans; antis, pr.p. of dominari, to rule over-dominus, a lord. ] a. ruling, governing, prevailing, predominant, controlling सत्ता चालविणारा, प्रबल, प्रधान, श्रेष्ठ, जबरदस्त, जोराचा, प्राबल्यवान्, सत्ताधीश, श्रेष्ठ, अष्टाधिकारी. २ (mus.) गाण्यांतील पांचव्या स्वरासंबंधी. D. n. mus. गाण्यांतील पांचवा (उंच) स्वर m. Dom'inance, Dom'inancy n. सत्ता f, अधिकार m, प्राबल्य n, प्राधान्य n, श्रेष्ठत्व n. Dom'inantly adv. Dominate (dom'-i-nat) [L. dominatus, p. p. of dominari, to dominate. dominus, a lord. ] v. t. to predominate over, to rule, to govern अधिकार-सत्ता-अम्मल चालविणे; as, “A city Dominated by the axe." D. v. i. to be dominant प्रमुख होणे, सत्ताधीश असणे. D. v. t. to rule over, to control, (-वर) अधिकार m-सत्ता f, चालविणे-गाजविणे, (-वर) राज्य करणे. D. v. i. to be dominant, to lord it over प्रबळ जबरदस्त होणे. Domina'tion n. dominion, supre-