पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1193

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

or drawn in outline रेखाटणे n, नकाशा वगैरे काढणे n, रेखांकन n, नकाशा m, बाह्याकारलेखन n. ७ the form of any writing as first drawn up; the first rough sketch of a written composition to be filled in, on completed मसुदा m, नमुना m, खरडा m, आकारलेखन n. see draught. ८ depth of water necessary to float a ship (जहाज तरंगण्यास लागणारी) पाण्याची खोली f- उंची f. ९ a current of air हवेचा प्रवाह m, झोत m, ओघ m, वाऱ्याचा झोत m. १० a narrow border left on a finished stone, worked differently from the rest of its face कारागिरीच्या दगडाची बाजू f, कड f, कांठ m. ज्यावर कुसरीचे काम केले आहे अशा दगडाची सभोवतालची पट्टी f, बाजू f, फरशीच्या दगडांच्या कडेची खतावणी f. Draft v.t. to draw the Outline of, to delineate (चा) नकाशा m- आकृति f. काढणे, रेखांकन करणे, रेखाटणे. २ to compose and write मसुदा-नमुना-खरडा तयार करणे, मजकूर जुळवणे, मजकूर जुळवून लिहिणे; as, To draft a memorial. 3 to draw from a military band or post, or from any district, company or society, to detach, to select (फौजेंतून किंवा फौजेच्या एखाद्या तुकडीतून, किंवा एखाद्या मंडळींतून-समाजांतून) कांहीं शिपाई निवडणे, निवड करणे. ४ to transfer by draft हुंडीने पाठविणे. Draft-horse n. जड-दांडगी-भक्कम ओझी वाहणारा घोडा m, ओझ्याचा घोडा m, ओझी वाहणारा किंवा नांगरास लावावयाचा घोडा m. बसावयाचा किंवा गाडीचा नव्हे. Draft-ox n. ओझ्याचा-गोणीचा बैल m. Draft-tube n. an airtight pipe extending downward into the tail-race from a turbine wheel located above it to make the whole fall available;- called also Draft-box n. पाणचाकांतील एक पोटनळी f. Drafts-man n. one who draws pleadings or other writings कैफीयत वगैरे तयार करणारा. २ one who draws plans and sketches of machinery, structures and places; also more generally one who makes drawings of any kind यंत्रे, इमारती. आणि मोकळ्या जागा वगैरेंचा नकाशा 'प्लान'काढणारा. Drafts'manships n. the office, art or work of a draftsman नकाशे-प्लान-काढणाऱ्याची कला f- किंवा कसब n, नकाशा वगैरेंचें काम n. N. B.--घाऊक घेतलेला माल, किरकोळीने विकतांना प्रत्येक खेपेस थोडथोडा जास्त जाऊन तुटतो, ती तूट भरून यावी म्हणून घाउकविक्री करणारे व्यापारी काही माल जास्त देतात किंवा वजनांत बाद घालतात. त्यास D. असें म्हणतात. of. कढता, कांटा. Drag ( drag ) [ A. S. dragan, to drag, to draw.] v. t. to draw slowly or heavily onward, to pull along the ground by main force, to haul, to trail. (कष्टाने) ओढणे, (जमिनीवरून जोराने) पुढे ओढणे, (कोणतीही जड वस्तु जमिनीवरून) खरडीत-फरफटीत-फरफटीत नेणे, जी वस्तु फरफटल्याशिवाय किंवा जमिनीवर अगर दुसऱ्या सपाटीवर जोराने वर्षण पावल्याशिवाय मोढता येणार नाही अशाच वस्तूला हा शब्द लावतात, as,