पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/606

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

झालेलें) पडसें n, अभिष्यंद, शैत्य n [असें शैत्य झाले. असतां थोडासा ज्वर, घसा सुजल्यामुळे घोगरा आवाज, खोकला व नाकांतून पाणी ही लक्षणे होतात.], प्रतिश्याय (according to माधवनिदान an old medical work ). [C. of a horse शेंबा.] Catarrhal, Catarrhous a. पडशाचा, पडशाविषयींचा, पडशाने झालेला, शैत्यज. Catarrhal fever शैत्यज्वर. Catarrh of the bladder मूत्राशयाची पिच्छात्वचा सुजून होणारा अभिप्यंद-श्लेष्मस्राव. Catarrh of the bronchial tubes लघुश्वासनलिकेच्या पिच्छात्वचेचा अभिप्यंद. Catastrophe ( kat-as'tro-fé ) [Gr. kata, down. and strephein, to turn.] n. नाटकाचा उपसंहार m, आकस्मिक परिणाम m, निर्वहण n, निर्वाह m. २ (a) a ruinous issue or event दुरंत m, दुष्परिणाम m, दुःखपरिणाम m, अरिष्ट n. (b) a sudden calamity आकस्मिक संकट n- आपत्ति f- आपदा.. ३ (जमीन एकदम खाली जाऊन किंवा एकदम वर. येऊन होणारा) आकस्मिक फेरफार m- हालचाल f. Catastrophic. a. Catas'trophism n. (भूगर्भशास्त्रांतील) जमिनीत भूगर्भात एकदम भौतिक स्थित्यंतरे झाल्यामुळे भूगर्भिक फेरफार झाले आहेत असे मत n, आकस्मिक स्थित्यंतरवाद. Catas'trophist n. आकस्मिक स्थित्यंतरवादी. Cat-call, see Cat. Catch ( kach) [O. Fr. cachier, to hunt, to chase, hence to catch.-L captiare, for captare, to catch.capcre, captus, to seize.] v. t. to lay hold of or on, to apprehend. धरणे, हातांत धरणे, पकड़णे. २ to receive in its passage झेलणे, झेलून घेणे, झिकणे (R.); as, To C. a. ball. ३ to get hold of, to get into one's power धरणे, डावाखाली-डावांत-&c. आणणे,

आवाक्यांत येणे in. con., घावाडावांत सांपडणें in. con., पटकावणे; as, "Torment myself to catch the English throne." ४ (a contagion or disease) घेणे, जडणे in. con., लागणे in. com., येणे in. com.; as, To C. the plague. ५ (a song or tune) to take up and follow उचलणे. ६ (as in speech or conduct) to lay hold of पकडणे, गोवणे, कबजी धरणें or पाडणे, पछाडणे, कडसणीत धरणे; as, To C. him in his words. ७ (with up ) गाठणे, मिळवून घेणे; as, To C. up a traveller in advance. ८ हिसकावणे, हिसकावून घेणे. ९ अचूक-एकदम पकडणे; as, To C. a thief in the act of stealing. १० (मध्ये) पसरणें-(ला) लागणें; as, The fire caught the adjoining house. ११ मनरंजन करणे, मनहरण करणे, रिझवणे; as, "The soothing arts that catch the fair.” १२ (सहानुभूतीमुळे अनुकरणाकरितां) पतकरणे, स्वीकारणे, घेणे, उचलणे. १३ (वेळेवर जाऊन) पकडणे; as, To C. a train. [To C. fire (ला) आग लागणे. २ fig. मनोविकार-महत्वाकांक्षा-प्रेम ह्यांना स्फूर्ति येणे, जोर-आवेश येणे, (चा) भडका होणे, पेट घेणे. To C. it colloq. खरडपट्टी निघणे in. con.; as, “He catches it up if he does not bring |