पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/649

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Pl.) अप्रतिम आकृति f- सौंदर्य n. ४ (in singular) मोहकता. C. v. t. to subdue or affect by charms, to bewitch भारणे, मंत्रणें or मंतरणें, भारणी f. घालणे-टाकणे, मोह m- मोहनी f-मोहिनी-भुरळ f- भूल f. भुलवण f- &c. घालणे-करणे, चेटक n- कुवेडे n- &c. करणे, मंत्रित करणे. २.fig. to enchant, to captivate, to fascinate मोहणे, मोह m- मोहनी f- मोहिनी-भूल-घालणे, भारणे, वश करणे, भुलवणे, रंजविणे, रंजन n. करणे g. of o., मोहित-रंजित करणे. (३ with of as scorpion-sting, &c.) मंत्राने-मंत्र टाकून-मंत्र घालून-&c.-उतरणें. ४ शमविणे, शांत करणे; as, “Music, the fiercest grief can c." ५ (a) (वाद्य इत्यादि) सुस्वर वाजविणे; as, " Here we our slender pipes may safely charm." (b) सुस्वर गाणे ; as, "O what song shall I charm out!" C. v. i. to use magic arts or occult power तोडग्याचें कार्य करणे, मंत्रविद्या चालविणे. २ to act as a charm, to please greatly आनंददायी-रंजक-मोहक असणे. ३ सुस्वर वाद्य वाजविणे. Charmed p. (v. V. 1.) भारलेला, मंतरलेला, मंत्रित, अभिमंत्रित, मोहित. २ मोहलेला, भुललेला; रंजित, वश. Charmer n. (v. V. 1.) a magician भारणारा, मंतरणारा, मोहक, मंत्री (in the sense of मांत्रिक), पंचाक्षरी, भुताळ्या, चेटक्या. २ मंत्र घालून-टाकून-फूकून उतरणारा, उतारी. ३ मोहित करणारा (in this sense usually applied to a woman). Charm'ful a. abounding with charms जादू-टोण्याची, जादु टोणे असलेली. २ मोहक, मारू. Charm'-ing p. a. मोहक, मनोरम, मनोहारी, मनोरंजक, रंजक, हृदयग्राही, हारी, हारक (in con.), हृदयंगम collog. उमदा. C. n. (v. V. 1.) भारणे n, मोहणे n, मोहन n, मोह m, वशीकरण n, मंत्र n, वशक्रिया f. २ मोहित करणे n, मनोहरण n, चित्तहरण n, मनोरंजन n, रंजन n. Charmingly adv. (v.A. 2.) मनोरंजनपूर्वक. Charmingness n. (v. A. 2.) मोहकत्व n, रंजकत्व n. Charm'less a. कुरूप, ऐदी, बोजड. Charmel (kär'-mel) (Heb.] n. a fruitful field फलपुष्पादिकांनी युक्त अशी भूमि f, समृद्धा-सुफला-भूमिः as, "Libanus shall be turned into C. and Charmel shall be esteemed as forest.” Charnel (chär'nel ) [O. Fr. charnel, carnal, lit. containing carcases.] a. स्मशानवत्, स्मशानासारखा. C. n. स्मशान n, स्मशानभूमि f. Char'nel-house n. शवास्थि टाकण्याची विहीर f- स्थान n, देवळाजवळचें स्मशान n, शवास्थिगृह n. Charon (ka.'ron) [Gr.] m. myth. the son of Erebus and Nox whose office it was to ferry the souls of the deceased ग्रीक पुराणांतरीचा केरुन नांवाचा यमदूत m. Charr (chär), same as Char.

Chart (chārt) [0. Fr. charte.-L. charta, a paper.Gr. kartu, a paper.] n. a marine map समुद्राचा नकाशा m [ह्या नकाशांत खडक, रेतीचे उंचवटे, खाड्या, बंदरे दाखविलेली असतात. ], समुद्रपट m. २ ता