पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/695

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चक्राकार फिरवणे, भोवती जाणे. C.v.i. चक्राकार-भोंवती फिरणे. Circuiteer' n. spec. फिरता न्यायाधीश. २ फेरी करणारा, भोवताली जाणारा. Circuitous a. round-about, indirect फेऱ्याचा, घेऱ्याचा, गिरक्याचा, गिरकांड्याचा, भाँवांडयाचा, as, A.C. road. २ द्राविडी प्राणायामाचा; as, A.C. manner of accomplishing an end. Circu'itously adv. , फेऱ्याने, फेरा घेऊन. Circu'ity n. चक्राकारगति f, दीर्घसूत्रिक गति f. Circuitjudge फिरता न्यायाधीश m. Divided circuit विभक्त मंडळ n. To make a circuit फिरतीवर् जाणे. Circular ( sèr'–kū-lar) [ L. circularis, from circulus, circle.] a. चक्राकार,मंडलाकार, चक्रवत्, वृत्ताकार, वाटोळा. [C. TOUR पुन्हा आरंभस्थानांतच शेवट होणारा प्रवास, प्रवासप्रदक्षिणा f] २ चक्ररूपी, अन्योन्यपर्यवसायी, एकमेकांत पर्यवसान होणारे; as, "The life of man is a perpetual war, in misery and sorrow circular.” 3 circuitous, round about, indirect आढेवेख्याचा, आढेवेढे घेणारा, as, Do not be so C. 4 पुष्कळांना उद्देशून लिहिलेला; as, A C. letter. ५ of the nature of arguing or reasoning in a circle अन्योन्याश्रयदोषाचा, चक्रानवस्थेचा. C.n. (short for Circular latter or note) जाहिरात f, प्रसिद्धिपत्र f, सरचिठ्ठी f, वटचिट्ठी f, आज्ञापत्रिका f. [C. ORDER. वटहुकूमसामान्यादेश.] Circular'ity n. गोलाकारत्व n, गोलाकृति f, गोलपणा m, चकता f, चक्राकार m, वृत्ताकार m. Cir'cularly adv. (v. A. ) in a circular form चक्रासारखा, मंढलवत् , वृत्तवत्. २ with a circular motion वाटोळ्या गतीने, चक्रगतीने, वर्तुलगतीने, चक्रन्यायाने. Circular are परिघाचा कोणताही चाप-कंस. Circular measure math. चापमान, चापीयमान 3 Circular motion वाटोळी गति, वृत्ताकारगति f, वर्तुळगति f, चक्राकार गति f. Circular note पुष्कळ मनुष्यांना एकाच अर्थाचे लिहिलेले पत्र n, जाहीरचिठ्ठी f. Circular numhers arith. आवर्तघातांक, घातपरिवर्त्याक m, स्वतःचे व आपल्या घाताचे अंत्यांक एकच असणाच्या संख्या, as, ५ आणि ६. Circulate (sèr'kū-lät) (L. circulare, circulatus, to surround, to make a round from circulars, to gather into a circle.] v.t. फिरवणे, चालवणे, हातोहात हातो-हाती-हातोपात फिरवणे चालवणे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरवणे, चालू करणे. २ सर्वत्र कळविणे, प्रसिद्ध करणे, प्रसार करणे ; as, To C.a report. C. v. i, to move round and return to the same point फिरणे, हिंसणे, भ्रमणे, चालणे, एका जागेहुन दुसऱ्याजागी जाणे, अभिसरण होणे;as, The blood c.s in the body. 2 to pass from place to place, from persons to person, or from hand to hand परिभ्रमण करणे; as, Money C, s. A story C.s. Cir'culable a पसरण्यास-चालवण्यास-प्रसार करण्यास योग्य. Cir'culant n. पसरणारा. Circula'ting a. पसरणारा, &c. 2 arith as, C. decimals. Circulation