पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/709

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



गव f. घालणे or कवेत-वेंगेंत धरणे. [To C. to one's boscm पोटाळणे, पोटाशी धरणे, उराशी धरणे.] ३ to catch and hold, to grasp आवळणे, आवळून धरणे, मुठीत-चौड्यांत धरणे. Clasp'ed p. (v. V.) कंवटाळलेला, आलिंगित, आंवळलेला, आंवळून धरलेला. Clasp'er n. ताणा m, पागोरा m. २ फांसा m. Clasp'ing n. act. कवळणें n, कवंटाळणे n, कवळून धरणें n, आलिंगन n, आंगकवळी f, आवळणे n. Clasp-knife n. मोडसुरा m, dim. मोडसुरी f, मुठीत पात बसणारा-मिटणारा चाकू m. Clasp-lock n. कमानीच्या साधनाने लागणारे कुलूप n. Clasp-nut n. mech. पकडचाकी f. Class (klass) [Fr. classe, a rank--L. classis, a class, a collection. ] n. a group of individuals ranked together as possessing common characteristics जाति f, जात f, गण m, वर्ग m, पक्ष m, विल्हे f, विल्हा m, प्रत f, खातें n, प्रकरण n, प्रकार m, मंडळी f.pl; as, The different classes of society; The educated classes. २ (of scholars) वर्ग m. ३ (of people or men ) जाति f, जात f, मंडळी f, लोक (in comp. as, ब्राह्मणलोक, शूद्रलोक, &c.) [The higher classes, compreh. उच्च-श्रेष्टवर्गाचे लोक, केवळ काबाडकष्ट न करणारे लोक. The lower classes, compreh. काबाडकष्ट करणारे लोक, खालच्या कनिष्ट वर्गाचे लोक.] C.v.t. to classify जात f. लावणे, प्रतवार-जातवार-विल्हवार लावणे, वर्ग m- करणें-बांधणे, प्रकार-प्रत करणे. C.v.i. वर्गात असणे, सवर्गी होणे. Class'able, Class'ible a. वर्ग करण्याजोगा. Class'ed, Class'ified p. (v. V.) जातवार लावलेला, spec. गणीभूत, वगीभूत-कृत. Class-fellow,-mate n. सहाध्यायी m. शाळेतील सोबती m. Class'ic n. उत्तम ग्रंथ m, साहेबनामा m, प्राचीन ग्रीक किंवा लॅटीन भातील ग्रंथ-राज, प्रथोत्तम, कोणत्याही कलेचे श्रेष्ठकाम, आपआपल्या जातींतील श्रेष्ठ वस्तु, कलोत्तम. २ उत्तमग्रंथलेखक m. कविराज m, वरकवि m, श्रेष्ठकवि m, उत्तम ग्रंथकार m, सर्वमान्य अशा श्रेष्ट नियमांप्रमाणे ग्रंथ लिहिणारा किंवा एखादें कलेचे काम करणारा. ३ रोमन व ग्रीक लोकाच्या उत्तम ग्रंथांत प्रवीण मनुष्य m. ४ ( in this sense used in the pl.) प्राचीन ग्रीक किंवा लॅटिन भाषेतील ग्रंथराजसमूह, कोणत्याही भाषेतील ग्रंथराजसमूह. Class'ic, Class'ical a. श्रेष्ठ पहिल्या प्रतीचा-वर्गाचा, प्रथमवर्गीय, सरस, उत्तम. २ of or relating to the first rank in literature or any other art ग्रंथराजीय, सर्वमान्यग्रंथासंबंधी, कोणत्याही ललितकलेच्या उत्तम कृतीसंबंधी, कलाकृतिराजीय, 3 spec. प्राचीन ग्रीक किंवा लॅटिन प्रथमवर्गीय ग्रंथाकारासंबंधी, कोणत्याही प्राचीन पहिल्या प्रतीच्या ग्रंथाकारासंबंधी. ४ approved, standard सर्वमान्य, सर्वोत्कृष्ट. Class'icalness. Class'icality n. प्रथमवर्गीयता f, ग्रंथराजीयता f, कृतिराजीयता f, सर्वमान्यता f, सर्वोत्कृष्टता f. Class'icality n. पहिल्या प्रतीची विदत्ता f, प्रथमवर्गीय विद्वत्ता f. २ प्रथमवर्गीयकृति.