पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/764

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तील रीत-संप्रदाय-भाषाविशेष m. Colonisa'tion n. वसाहत वसविणे, वसाहत करणे n. Col'onise v. t. to establish a colony in नवी वसाहत करणें, देशाचा-राज्याचा फांटा वसविणे. २ to migrate to and seltle in नवी वस्ती करणे, वसविणे, दिवेलावणी करणे. C. v.i. दूर देशांत जाऊन राहणे. Colonist n. वसाहतीत राहणारा, वसाहतवाला, देशशाखानिवासी, वसाहत करणारा. Colonised' pa. t. & p. p. Col'oni'sing pr. p. & v. n. Colophon ( kol'o fon) [ Gr. kolophon, a sunmit, top, finishing stroke. In early times the colophon gave the information now given on the title page.] ग्रंथाच्या शेवटी ग्रंथाचें नांव, काल इत्यादि दिलेली माहिती f, नामकालपूर्वक परिसमाप्ति f, समाप्ति लेख m, हीच माहिती सध्या नामपृष्ठावर दिलेली असते. Colophony (kol'-ofo-ni) [ First brought from Colophon in Ionia.] n. a dark coloured resin obtained from turpentine काळ्या अथवा पिवळट रंगाची राळ f. Collophonic a. काळ्या रंगाच्या राळे संबंधीचा. Coloquintida ( kol-o-kwin'ti-da ) n. see Colocynth. Colossus (kol-os'us) [L. colossus, Gr. kolossos, a huge statue at Rhodes at the entrance of port.] n. a gigantic statue दोहों कांठांवर पाय ठेऊन उभा असलेला आपोलो देवाचा होड्रस बंदरांत शिरताना दिसणारा भव्य पुतळा m. भीमविग्रही-राक्षसी पुतळा m, विशाळ आकृतीचा पुतळा m. Coloss'-al a. विशाळ, प्रचंड, जगदाळ. Colossal-wise adv. Shakes.) दोन्हींकडे पाय टेंकून. Colosseum Coliseum n. व्हेस्पॅसिअन्चे रोममधील उभयासन वाटोळे असे प्रचंड नाटकगृह n. Colostrum (ko-los'trum) [L] n. beestings, green milk सस्तन प्राण्यांचे कोवळें दूध n, चीक m. Colostra'tion n. कोंवळ्या दुधापासून लहान मुलांस होणारा रोग m. Colostric' a. Colour (kul'er) [O. Fr. colour, colour. L. acceolorem, from color, a tint.] n. रंग m, वर्ण m, राग (S) m. [ PRIMARY OR SIMPLE OR FUNDAMENTAL COLOURS मूल रंग, एकाकी किंवा साधे रंग; जसे जांभळा, पारवा, निळा, हिरवा, पिवळा, नारंगी आणि तांबडा सर्व रंग पृथग्भूतसूर्यकिरणामध्ये दिसतात. SECONDARY C. s हे दोन किंवा अधिक मूल रंगांपासून होतात, मिश्ररंग. COMPLIMENTARY C.s पुरकरंग. ज्या दोन रंगांच्या एकीकरणाने एका पांढरा रंग उत्पन्न होतो त्यांस एकमेकांचे पूरकरंग असे म्हणतात. ACCIDENTAL C. S आंगतुक किंवा औपाधिक किंवा उत्तर कागदाच्या पांढ-या पानावर रंगीत चक्ती ठेवून तिजकडे न्याहाळून काही वेळ पाहिले तर असा उत्तर किंवा आगंतुक रंग दिसतो. २ spec. मनुष्याचा काळा रंग m. [A PERSON OF COLOUR. (AMERICAN ) शिद्दी मनुष्य m. ३ complexion, hues मुखकांति f, तोंडाचें तेज n. [ TO CHANGE COLOUR नूर बदलणे,