पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/780

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सर्वांच्या संबंधाचा, सर्वसाधारण, सर्वोपयोग्य, समाजसत्ताक (S), सर्वांच्या सत्तेतला, सवोपयोगी. ४ ordinary, customary, frequent परिपाठाचा, परिपाठांतला, व्यवहारांतला, रोजचा, नित्यांतला, वहिवाटीचा, वहिवाटींतला, राबत्याचा, नित्याचा, साधारण, व्यावहारिक. ५ undistinguished. by rank or position मध्यम, सामान्य, मध्यम कुळाचा, मध्यम वर्गाचा, सामान्य कुळाचा वर्गाचा. ६ सर्वांच्या उपयोगी, सर्वांनी उपभोगण्यासारखा, सर्वोपयोग्य; as, "A dame who herself was common." ७ abundant बहुत, पुष्कळ, विपुल, प्रचुर, महामूर, मुबलक, रानोमाळ पडलेला, वाटेवर पडलेला. ८ belonging is all, universal, general सर्वांचा, सर्वांच्या संबंधाचा,सार्वजनिक,सार्वत्रिक, सरीसर्वत्राचा. ९. public. popular, general लोकांचा, लोकांतला, , लौकिक, व्यवहारांतला, लोकरूढींतला, लोकरूढीचा, लोकप्रसिद्ध, प्रसिद्ध. १० (of things) ordinary, not excellent हलका, वापरण्याचा, खैराती, चालीचा, नित्यवहिवाटीचा, नित्याचा, बाजारी. [ABOVE COMMON असाधारण, असामान्य, लोकोत्तरः] 19 (obs.) profane अपवित्र. Common carrier n. आडे घेऊन माल वाहणारा. Commoncrier n. दौंडी-थाली पिटणारा. C. denominator समच्छेद m, समहर m. C. difference n. alye. उत्तर n, चय m. C. divisor or C. measure सामान्य-निश्शेष भाजक. C. noun सामान्यनाम. C. gender n. gram सामान्यलिंग n. Common Law n. the unwritten Law (of England), administered by the king's courts, which purports, to be derived from ancient and universal usage, and is embodied in the older commentaries and the reports of adjudged case (opposed to siatute law, or equity or ecclesiastic law er admiralty law) देशाचारावरून किंवा जुन्या निर्णीत व्यवहारांवरून ठरलेला कायदा m, अलिखित व्यवहार (शास्त्र). Common-place. [COMMON PLACE IS A RENDERING OF L. LOCUS COMMUNIS, WHICH CORRESPONDS TO THE ARISTOTELIAN 'COMMON TOPICS.' IT LITERALLY MEANS A GENERAL THEME OR ARGUMENT APPLICABLE TO MANY PARTICULARE CASES. Its present current sense is an opinion or statement, generally accepted or taken for granted an everyday swaying (slightingly) a platitude trniem n. अतिशय प्रसिद्ध सिद्धान्त-वचन-विधान'n. सर्वाना महशूर माहीत असलेले वचन n, शिळेउष्टें विधान n, शिळा-सामान्य सिद्धान्त m. २ (obs.) सरणवही Common place. v.t. स्मरणवहीत लिहून ठेवणे a. ४. सामान्य, जुनें, शिळे fig. उच्छिष्ट.fig. उष्टा fig. Commonplace-book n. प्रसिद्ध वचनं टिपून ठेवण्याची स्मरणवही f, बाड n. Common-pleas n. प्रजांनी एकमेकांविरुद्ध आणलेले खटले (राजाने प्रजेविरुद्ध आणलेले नव्हे). Common Prayer n. (The Book ) साधारण प्रार्थना f. C. ratio n. alge. गुण m, गुणोत्तर n. Common report n. जनप्रवाद m, लोकवार्ता f. Com