पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/821

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

धरून, विश्वासपूर्वक. २ खातरीने, निश्शंक, निश्शंकपणाने, निभ्रीत or निभ्रांत. ३ उमेदीने, दमाने, अवसानाने, धमक धरून, &c. Confid'er n. See Confiding a. given above. Confid'ingly adv. Confid'ingness n. Confidence trick-game n. a method of professional swindling, in which the victim is induced to hand over money or other valuables as a token of confidence in the sharper जिच्या योगाने फसणारास, भामट्यावर आपला पूर्ण विश्वास आहे असे दाखविण्यासाठी आपल्या जवळचा पैसाआडका देण्याची भुरळ पडते अशी खुबी f, ज्यास्त फसविण्याकरितां भामट्याने आपल्यावर विश्वास बसवून घेण्यासाठी केलेले कृत्य. Confidence man one who practices this trick आपल्यावर जास्त विश्वास उत्पन्न करून लोकांना फसविणारा, भामटा, लुचा, ठक. To take one into confidence आपल्या रहस्यांत-विश्वासांत घेणे, अमुक एक मनुष्य आपला विश्वासपात्र आहे असे समजणे. Contiguration ( kon-fig'-ū-rā'shun) [L. con, together & figurare, to form.] (R.) आंतररचना f. २(एखाद्या वस्तूच्या आंतररचनेमुळे आलेला) बहिराकार m, बाह्याकार, बाहेरचा आकार m, बाह्याकृति f, बाह्यरूप n. ३ astron. ग्रहांची सापेक्ष स्थिति, ग्रहांची स्थिति f. Config'urate v. i. to take form विशेष आकार घेणे, साकार होणे. Config'ure v. t. (आकार) करणे, घडवणे, डौल-आकार देणे. Confine (kon-fin') [ Fr. confiner, to border upon. L. con, together & finis, the end.] n. (usually in pl.) (a) मर्यादा f, सीमा f' शीव f, हद्द f, हद्दीचा देश m. (b) शिवेलगतचा देश m-प्रांत m; as, " Events that came "ss within the C.s of Judea." २ (obs.) Prison कैदखाना m, बंदीखाना m, तुरुंग m, कारागृह n, कारागार. C. v. t. to limit, to bound, to restrict आळाबांधा m-आळा m-मर्यादा f-सीमा f-नेम m-बंधारण n. घालणे-करणे-करून देणे, ठेवणे-बसवणे (idio.)&c. with वर (ex. मी आपले जेवण दोन भाकरीवर ठेविलें आहे). २ (obs.) to imprison, to restrain कोंडणे, कैद करणे, कोंडी f, कोंडणी f. करणे g. of o., कैदेत-बंदीत घालणे-टाकणे, अटकेत घालणे. ३ to restrain प्रतिबंध m-निग्रह (S.) m-निग्रहण (S.) n-निरोध (S.) m- निरोधन (S.) n. करणे g. of o. C.v.i. (obs.) (followed by on with) (देश) लागून-लगटून-भिडून-&c. असणे, (शी) एकशीव असणे. Confined' p.p.& a. (v. V. T. I.) आळाबांधा घातलेला. २(v. V.2.) कोंडलेला, बंदीत-कैदेत घातलेला, कैदी. ३ (v. V. 3.) निबद्ध, निरुद्ध, निगृहीत. ४ not roomy अवघड, सांकड, कुंचड (R), अडचणीचा, दाटीवाटीचा, संकोचाचा, अप्रशस्त. ५ delivered (spec.) बाळंत झालेली, प्रसूत झालेली. [To BE CONFINED बाळंत-प्रसूत होणे. ६ (The bowels) बद्ध, अवरुद्ध see Costive. Confinedness n. (v. A. I.) want of room अडचण f, संकोच m. [To SUFFER Or FEEL C. बांधलेले-बांधलेसें वाटणे, अवघडणें. Confine'ment n. (v. V.