पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/836

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सत्यबुद्धीनें. Con'scien'tiousiness n. (V. A.) सदसद्विवेकबुद्धिनुरूप-मनोदेवतेनुरूप वर्तन n, वागणूक f, इमानीपणा m, न्यायनिष्ठा f, सत्यनिष्टा f. Con'scionable a. Con'scionableness n. Con'scionably adv. यथान्याय, न्यायाने, धर्माने. Conscience clause धर्मसंबंधी बाबतींत सवलत देणारे कायद्याचे कलम n. Conscience money पूर्वी अपहार करून मागाहून पश्चात्ताप झाल्यामुळे गुप्तपणे सरकारांत भरलेले द्रव्य n. Case of conscience धर्माधर्मतेचा प्रश्न, योग्यायोग्यतेचा प्रश्न, दोषादोषविवेचक प्रश्न. Good or bad conscience सुष्ट किंवा दुष्ट अंत:करण. In conscience, In all conscience अंतर्यामापासून, सच्चेपणाने, योग्यायाेग्यतेचा विचार करून. To make a conscience of or to make a matter of conscience इमानाने चालणे-वागणे, मनोदेवता सांगेल तसे वागणे. Speak one's conscience (Shakes.) आपले स्वतःचे मत सांगणे-कळविणे-देणे. N. B.-Conscientious मनाला योग्य दिसेल तसे करणारा Scrupulous बारीक सारीक विचार करणारा. Conscious (kon'shus) [L. con & scire, sciens, to know. ] a. possessing the power of knowing one's own mental operations संज्ञावान्, देहाभिमानी, सचेतन, विचार करणारा, विचारक्षम. २ cognizant, sensible जाणून-समजून-ओळखून असलेला, ज्ञान असलेला' प्राप्तज्ञान, जातबोध, प्राप्तबोध; as, “The man who breathes most healthily is least C. of his own breathing." ३ known to one's self स्वतः पुरतेपणी माहीत असलेला. ४ having recovered. consciousness शुद्धीवर-सावध-हुशार असलेला. Con'sciously adv. देहभानाने, देहभानावर असून, सदेहभान, सचेतन, समजून उमजून. Con'sciousness n. (V. A. I. ) शुद्धि f, देहशद्धि f, भान n, देहभान n, सावधगिरी f, सावधपणा m, जाणीव f, होष m, फाम (always used with बे) f, प्रबोध m, संज्ञा f. [ BEREFT OF C. बेशुद्ध, बेहोश, निचेष्ट, निश्चेतनं, बेसावध. To RETURN TO C. देहावर-देहमानावर शुद्धीवर-स्थितीवर-ध्यानावर-स्मृतीवर येणे, संज्ञा f. येणे g. of. s.] २ बोध m, प्रतिबोध m. ३ समज m, माहिती f, उमज m. (V. पड), संवेदन n. ४ conscious feeling, senes of self अहंकार m, अहंमति f, अहंभाव m. ५ med. वेदनाशक्ति f. ६ metaph. चेतनाशक्ति f, ज्ञानशक्ति f, ज्ञानवत्ता f, संवेदना f. Conscribe (kon-skrib') [L.com, together & scribere, scriptus, to write.] v.t. (obs.) (लष्करी पटांत) नांव लिहिणे-नोंदणे-दाखल करणे. Con'script a. enrolled (लष्करी) पटावर लिहिलेला-मांडलेला-नोंदलेला. C. n. पटावर लिहिलेल्यांपैकी ज्याच्यावर लष्करांत नौकरी करण्याची पाळी आली तो. C.v.t. सक्तीने लष्करी नोकरी करावयास लावण्यासाठी पटांत नांव घालणे. Conscrip'tion n. (लष्करांत किंवा भारमारांत पाठविण्याच्या उद्द्शाने धमकणाऱ्या मनुष्याची) नांवे