पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/931

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

साथी m, कपटी-लबाड मनुष्य m. C. v. t. वांकविणे, वांकडे करणे. २ (R.) आडमार्गाला लावणे, भ्रष्ट करणे. C. n. वांकणे, वळणे. Crook-back n. कुबड n. Crook-backed a. कुबड्या, कुबडमोड्या, कुब्ज. Crooked a. वांकडा, वक्र, विनत. २ कुटिल, वक्र. ३ खोटा, कपटी; as, " C. dealings." Crook'edly adv. वांकड्या रीतीने. Crook'edness n. वांकडेपणा m, वक्रता f, कौटिल्य n. Crook-kneed a. वांकडे गुडघे असलेला, फेद्या-फेंगड्या पायांचा. Crook-shouldered a. वांकडे खांदे असलेला. Crook in one's lot (व्यवहारांत येणारा) कठीण प्रसंग. By hook or by crook कसेही करून, जसातसा, चांगल्या किंवा वाईट रीतीने, चांगल्या किंवा वाईट मार्गानें,योग्य किंवा अयोग्य उपायाने. Croon ( kroon) [ of imitative origin. ] v. t आपल्याशीच गाणं-गुणगुणणे. २ मधुर गायन करून शांत करणे. .C. v.t. गुरांप्रमाणे दुःखाने रडणे. Crop (krop) [ A. S. cropp, top, bunch, craw of a bird. ] n. पीक n, पीकपाणी n,. २ पाखराच्या गळ्यांतील अन्नाशयाची पिशवी f, चुनाळ m. ३ डोक्याचे कापलेले केस n. ४ घोड्यावर बसून फेरफटका करण्याच्या वेळचा अतिशय आंखूड वादीचा चाबूक m. ५ उभे शेत n, पीक n. ६ बोखा m, शेंडा m, तिटाळी f. [CROP OF FRUITS OR FLOWERS लाग, वाज, बार, उफर, उफरा. AUTUMNAL C. खरीप. DECLINING OF RIPENING C.s आंकड्यास येणे, पडणीस येणें. FAILURE of C. नापीक. VERNAL C. रब्बी. To C. OUT वर दिसणे. To C. UP अप्राधान्यपणाने-गौण रीतीने उपस्थित होणे. इतर वस्तूंच्या किंवा कारणाच्या प्रसंगाने पुढे येणे-उपस्थित होणे. ] C. V. t. खुडणे, तोडणे, बोखडणें (R.), बोडकावणे. C.v.i. पीक येणे. Cropped pa. p. Crop-eared a. मुंढ्या कानाचा. Crop'ful a. ( Miltion ) भरलेल्या पोटाचा, पूर्णोदर. Crop'per n. पीक कापणारा. २ धरते, लागते झाड n. ३ खंडाने पीक कापणारा. Crop'ping pr. P. Crop'ping n. कापणे n. Crop-sick a. अतिशय जेवल्याने आजारी,असमाधानी. Crop-tailed a. लांडा, छिन्नपुच्छ. Croquet (krūʻ-kā) [Fr. croquet, a bent stick.] n. एक प्रकारचा काठीने खेळावयाचा खेळ m. Crore (kror) [ East Indian ] n. कोटी m. f, कोड,शंभर लक्ष. Crosier, Crozier ( kro'-zhiér ) [L. crux, a cross.]n. क्रूस m, ख्रिस्ती धर्माची खूण f. २ येशू ख्रिस्ताचें मृत्युसूचक चिन्ह n. ३ ख्रिस्तमत n.- धर्म m. ४ क्रूसाच्या शिक्याचे नाणे n , नाणे n, पैसा m. ५ क्रूसाकार दागिना m, क्रूसाच्या आकाराचा एखादा दागिना m. ६ सहीऐवजी केलेली क्रूसाची निशाणी f. ७ सत्वपरीक्षणार्थ आलेले संकट n. ८ क्रुसासारखी (+) फुली. ९ अक्करमास C.v.t (वर) क्रूसाची खूण करणे. Cross-bearer n. (एखाद्या समारंभांत) क्रूस घेऊन चालणारा, क्रूसवाहक