पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/934

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Crown ( krown) [ O. Fr. corone,-Fr. couronne.-L. corona, a crown.] n. मुकुट m, मुगूट m, किरीट m. २ शिरोभूषण n. ३ (with the) राज्याधिकारी m, राज्यकर्त्ता m, राजा m. ४ पारितोषिक n, इनाम n, बक्षीस n. ४ राज्यपद n, राजगादी f. ५ राज्याधिकार m, बादशाही अम्मल m, सत्ता f. ६ शोभा f, नाक n, भूषण n; as " Virtuous woman is a C. to her husband." ७ पराकाष्ठा f, अवधि m; as, "Mutual love, the C. of all our bliss." ८ शिखर n, अग्रभाग m. ९ शीर्षाग्र n, ब्रह्मांड n. १० (of a hat ) शिखा f, माथा m. ११ कमानीचा शिरोबिंदु m. १२ भट्टीचा घुमट m. १३ पांच शिलिंगांचें इंग्लंडांतील एक नाणे n. १४ एक तऱ्हेचा छापण्याचा कागद m. १५ geom. दोन समकेंद्र परिमितीतील क्षेत्र n. C.v.t. राज्याभिषेक करणे, गादीवर बसविणे. २ भूषित करणे. ३ संपूर्ण-परिपूर्ण करणे. ४ (चा) शिखर-कळस होणे; as, "Amidst that grove that crowns yon tufted hill.” Crown-agent n. स्काटलंडांतील सरकारतर्फे फौजदारी खटले तयार करणारा सालिसिटर m. Crown-colony n. सरकारी वसाहत f, मुख्य देशाकडून जिचा राज्यकारभार चालतो अशी वसाहत f. Crowned a. मुकुट घातलेला, मुकुटधारी, किरीटी, &c. २ भूषित, &c. [To BE CROWNED WITH SUCCESS सार्थक्य pop. सार्थक n, साफल्य n-&c. होणे g.of. s. कृतकृत्य होणे.] Crown'er n. (Shakes. ) हा करोनर शब्दाचा अपभ्रंश आहे. Crown'et n. लहान मुकुट m, मुकुटक m. Crown-glass n. खिडक्यांच्या तावदानांची एक प्रकारची कांच f. Crown'ing n. राज्याभिषेक m. Crown-jewels n. राजाचें जवाहीर n, सरकारी जवाहीर n. Crown-land m. सरकारी जमीन f. Crown-lawyer n. (फौजदारी खटल्यांत) राजाच्या वतीचा वकील m. Crown'less a. मुकुट नसलेला. Crown-post, King-post n. कैचीतला मधला किंवा मुख्य खांब m. Crown-prince n. राजाचे पश्चात् गादीवर येणारा राजपुत्र m, युवराज m. Crown-saw n. सिलेंडरला ( cylinder ) दांते पाडून केलेली वाटोळी करवत f. Crown-wheel n. उभ्या दांतांचें चाक n, (ह्याचे दांत चाकाच्या पातळीवर उभे असतात), तुंबा(?) m. Crown-witness n. (फौजदारी खटल्यांत) सरकारी साक्षीदार m. Crucial ( krū'shi-al) [L. crux, crucis, a cross. ] a. क्रूसाच्या आकाराचा, क्रूसासंबंधीं. २ जिवावरचा, जिवापरता, प्रखर, फार कडक. ३ logic. निर्णायक. Cru'ciate a. bot. क्रूसाकृति, क्रूसाकार पाने किंवा पाकळ्या असलेला. Crucible ( krū'si-bl ) [ L. L. crucibulum, Origin doubtful.] n. मूस f, पूट n, आवर्तनी f. २ वितळलेली धातु रहाण्याकरितां भट्टीच्या तळाशी केलेली पोकळ जागा f, धातुरसपात्र n. [DIPPING ROD OF A CRUCIBLE ईपिका f, तुलिका f.] ३ कडक परीक्षा f, कसोटीचा प्रसंग m. Cruciferæ (krū'si-f'erē ) [Fr. crucifier. L. crux, crusis