पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/948

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अभिशाप m, तळतळाट m. २ आपदा f- महासंकट n- उपाधि इत्यादिकांचे कारण n; as, "The common curse of mankind is folly and ignorance." (Shakes.) Cursed, Curst a. शापलेला, शापित, अभिशप्त, शापग्रस्त, शापदग्ध. २ शापाई, शाप्य, अतिद्वेप्य, अतिद्वेषयाग्य अतिद्वेपार्ह, अतिनिंद्य (R.). Cur'sedly adv. Cur'sedness n. Cur'ser n. Cur'sing n.-act. शाप देणे n , शपन n, अभिशापन n, अनिष्टचिंतन n. Curst'iness n. तिरसटपणा m, शिवरेपणा m; " Curses like chickens come home to roast." ज्याचे शाप त्यालाच भोंवतात. cf. ज्याची गाळी त्यास जाळी ('To curse by bell, book and candle'.), (रोमन कॅथलिक लोकांत) पूर्ण बहिष्कार घालणे. See under "Bell" Cursive (ker'siv) [L currere, cursum, to run.) a. जलद चालणारा-वाहणारा. C. hand जलद लिहिलेले अक्षर n, फर्डेशाही f. Cur'sively adv. Cursory ( kér'sori) [L. cursor, a runner. ] a. घाईघाईचा, जलदीचा, वरवरचा, उपराउपरचा, उपेक्षाबुद्धीचा, विहंगमदृष्टिक. Cur'sorary a. ( Shakes.)See Cursory. Cur'sorily adv. वरवर, जलदीने. cur'soriness n. वरवरपणा m. Cursoriness of view स्थूलदृष्टि, विहंगदृष्टि. Curt ( kert) [ L. curtus, shortened. ] a. संक्षिप्त आणि तुटस. २ (असभ्यता दिसून येईल इतके ) संक्षिप्त. Curt'ate a. कमी केलेला. २ astron. the distance of a planet or comet from the sun or earth projected Upon the plane of ecliptic क्षेत्रांशांतर n, शरकोटी n. Curt'ly adv. Curt'ness n. Curtail (kex-tal') [L. curtus, short. ] v. t. शेंडा-बुडखा तोडून तोकडा करणे, छाटणे, कापणे, उणा-कमी-न्यून करणे, संक्षेप करणे. Curtail'ing pr. p. Curtailed pa. p. Curtail'ment n. कापणे n. Curtail-step n. जिन्याच्या पायथ्याची वाटोळी पहिली पायरी f. Curtail-dog n. लांडा कुत्रा m. Curtain (kex'-tin) [O. Fr. cortine, curtine, from L. L. cortina, curtain.] n. पडदा m, जवनिका f, प्रतिसारा f,तिरस्करिणी f. [ BEHIND THE CURTAIN पडद्याआड, पडद्याच्या पलीकडे, गुप्त.. DRAW THE CURTAIN पडदा एकीकडे सारणे-करणे, गुप्त राखणे, प्रगट करणे. MOSQUITO C. मच्छरदाणी f. To DROP THE C. प्रवेश पुरा-समाप्त करणे, पडदा पाडणे. THE CURTAIN FALLS खेळ संपतो-पुरा होतो. STRING PASSING THROUGH THE RINGS, OF A CURTAIN कडसणी f.] २ fort. किल्ल्याच्या दोन बुरुजांमधील किंवा दोन दरवाज्यांमधील कोट m. C. v.t पडद्यांनी झांकणे. C. lecture एकांती भ्रताराची बायकाेने केलेली कानउघाडणी f, कांतोपदेश m, कांतेचा उपदेश m. Curtsy, Curtsey ( kext-si) [ See Courtesy. ] n. स्त्रीचे लहान मुलांचे नमन n. C. v. t. स्त्रीसारखें-मुलासारखे नमन करणे. Curve ( kėrv) [L curvare, from curvus, curved.] n. वांक m, वळण n, नति f. २ geom. वक्र n, वक्ररेषा f,