या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जयरामला भेटण्याविषयी लिहिलं होतं, पण त्याला भेटणं शिवरामला रूचत नव्हतं. जयराम धाकटा भाऊ, त्यानंच आपल्याला भेटावं. आपण काय म्हणून त्याच्याकडं भेटायला जायचं ? बाप्पा त्याला कां सांगत नाहीत शिवरामला भेट म्हणून ? आणि सांगितलं नसेल कशावरून पण तोच घमेंडीनं येत नसावा. नोकरीसाठी रोज आपण अनेक ठिकाणी जातो. नकार घेऊन येतो. तसंच एकदा जयरामकडं जावं, पहावं काय ऐट आहे ती तरी. अशा विचारानं एकदा उचल खाल्ली, आणि तो लोकलनं जयरामचं होस्टेल होतं त्या भागात गेला. चौकशी करीत करीत होस्टेलच्या फाटकाशी पोहचला. रखवालदारानं त्याला विचारलं. ● किसको मिलना है ?' "मी मैं मेरे भाईको मिलने आया हूँ ।' • कल सबेरे आवो रातको मिलना मना है।' “म .. मैं तो गाँवसे आया हूँ । कल मुझे वापीस जाना है ।' रखवालदारानं त्याला जवळ येऊन न्याहाळलं आणि म्हणाला. भाई जरा सम्हालके जावो । जमाना बदल गया है, नही बिगड गया है, भैय्या ।' ( .. ' अंदर जावो । मालूम पडेगा । अपनेको जल्दी है इसलिए मैं रोक नही सकता ।' शिवराम बिचकत बिचकत आत गेला. खांबाला टेकून दोन मुलं सिगारेट ओढत गप्पा मारीत होती. एकमेकांना टाळया देत होती. त्यांच्याकडं त्यानं जयरामची चौकशी केली तेव्हा त्यातील एकजण म्हणाला, " रूम नंबर आकरा. ती समोरची रूम.' त्या खोलीच्या दारात जाऊन तो उभा राहिला एकजण खुर्चीवर पाठमोरा बसून डोक्यावर ताट घेऊन चाचपडत घास घेत होता. त्याच्या समोर रंगीबेरंगी कपड्यात चार-पाचजण त्याला सूचना देऊन फिसफिस हसत होते. त्याचा हात भाजीच्या वाटीत गेला तेव्हा रसा सांडला. त्याच्या डोक्यावरून कपड्यावर ओघळ आले आणि त्या टोळक्याला मोठ्यांदा हासू आलं. त्याचवेळी त्यांचं लक्ष समोर-शिवरामकडं गेलं ते टोळकं एकदम हसायचं थांबलं. संशयानं पहात दरवाज्यापर्यंत पुढं सरकलं. रानवारा | २५