या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रावताळ्याच्या मळ्यात कामाला जात हुतो. त्यो मला गुरावाणी राबवायचा. रंगात येऊन चंदाची चौकशी करायचा. आचकाट- इचकाट बोलून आपुनच हासायचा. माझ्या घशात घास आडकल्यावाणी हुयाचं. रावताळ्या एकदिसी म्हणला, ' रामा, लेका तुला ल्योक झाला. पेढं वाट आता.' मी काय बोललोच नाय. त्योच पुढं म्हणतो कसा, • चार महिनं तुझ्याजवळ हुती तवा तरी मज्जा मारून घेतलीस का भडव्या ? का नावाचाच नुसता धनी झालास ?' मला कधी नव्हता आसा राग आला. मी रागानंच हाटकलं. 6 सावकार ! तुमच्या कामापुरतं बोला नाय तर तुमचं काम सोडीन.' बायकू सोडण्याइतकं सोपं नाय त्ये. कागदावर लिवून दिलंय तुझ्या भावानं.' " मग त्याचं त्यो येवून करील काम.' आस म्हणून झिरडीकोतच हातातलं खोरं तिथंच फेकलं नि घराकडं आलो. तर सोप्यात माणसांचा खांडवा. धा-पंधरा पावणं. जाऊन तिथंच मुकाट्यानं बसलो. थोड्याच वेळात उलगडा झाला. तात्याच्या लग्नाची यादी चालली हुती. तात्यानं उलटा पोरीच्या बालाच पैसा देवून लगीन जमोवलं हुतं. त्या धांदलीतबी तात्यानं माझ्याकडं एकदा रागान पाह्यलं. पण काईच बोलला नाय. त्या राती तात्या आपल्या टगे दोस्तांच्या संगती लई पिऊन झिंगला. मध्यान्हीला सारी लांडग्यावाणी आपापल्या घराकडं पांगली. अवघा तात्या उरला. मी वाकळत मुस्कूटून पडून हुतो. तात्या झोकं खात माझ्या जवळ आल्याची चावल लागली. 'रावताळयाच्या वस्तीवरन का आलास?" म्हणून त्यानं मला मारायला सुरूवात केली. आधी-मधी त्याचं झोक जात हुतं, तरी त्यो मला नेटानं ठोकं देत हुता. शेवटाला दमछाक झाला. माझ्या शेजारीच आंग टाकून दिलं. त्याची गडद झॉप लागली. घोरायला लागला, पण माझा जीवमातूर रातभर माशावाणी तडफडला. त्या रातीपासून रोजची रात तशीच दारूड्याच्या लागली. एका रातीला चंदाचा इषय निघाला. हाणमा कालव्यात जाऊ न्हावी तोंडाला दुबळा । ६३