पान:रामदासवचनामृत.pdf/106

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- - साक्षात्कार. स्वरूपाचा संयोगों । स्वरूपचि जाला योगी। याकारणें वीतरागी । निरंतर ॥४८॥ स्थिति बाणतां स्वरूपाची चिंता सोडिली देहाचा। याकारणे होणाराची। चिंता नसे ॥४९॥ . स्वरूपी लागतां बुद्धी । तुटे अवधी उपाधी। याकारणे निरोपाधी । साधुजन ॥ ५० ॥ साधु स्वरूपींच राहे । तेथें संगचि न साह। म्हणोनि साधु तो न पाहे । मानापमान ॥ ५१ ॥ अलक्षास लावी लक्ष । म्हणोनि साधु परमदक्ष। चोदूं जाणती कैपक्ष । परमार्थाचा ॥ ५२ ॥ स्वरूपी न साहे मळ । म्हणौन साधु तो निर्मळ । साधु स्वरूपचि केवळ । म्हणोनियां ॥५३॥ सकळ धर्मामधे धर्म । स्वरूपी राहणे हा स्वधर्म । हेचि जाणिजे मुख्य वर्म । साधुलक्षणाचें ॥५४॥ दा. ८. ९. १-५४. ४०.“ में त्रैलोकी नाही दान। तें करिती संतसज्जन." आतां वंदीन संतसज्जन । जे परमार्थाचे अधिष्ठान। जयांचेनि गुह्यज्ञान । प्रगटे जनीं ॥१॥ जे वस्तु परम दुल्लभ । जयेचा अलभ्य लाभ। तेचि होये सुल्लभ । संतसंगेकरूनो ॥२२॥ वस्तु प्रगटचि असे । पाहातां कोणासीच न दिसे । नाना साधनीं सायासें। न पडे ठाई ॥३॥ १ कैवार.