पान:रामदासवचनामृत.pdf/133

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

INE JUR - रामदासवचनामृत-दासबोध. [$ ५२ स्त्री वर्णितां सुखावला । लावण्याचे भरी भरला । तो स्वयें जाणावा चेवला । ईश्वरापासुनी ॥ २५ ॥ हरिकथेसी भावबळें । गेला रंग तो तुंबळे । निमिष्य येक जरी आकळे । ध्यानी परमात्मा ॥ २६ ॥ ध्यानी गुतले मन । कैचें आठवेल जन । निःशंक निर्लज्ज कीर्तन । करितां रंग माजे ॥२७॥ रागज्ञान ताळज्ञान । स्वरज्ञानेंसी वित्पन्न । अर्थान्वयाचे कीर्तन । करूं जाणे ॥ २८॥ छपन्न भाषा नाना कळा । कंठ माधुर्य कोकिळा । परी तो भक्तिमार्ग वेगळा । भक्त जाणती ॥ २९॥ भक्तांस देवाचें ध्यान । देवावांचून नेणे अन्न । कळावंतांचे जे सन । ते कळाकार जालें ॥ ३०॥ श्रीहरिवीण जे कळा । तेचि जाणाची अवकळा। देवास सांडून वेगळा । प्रत्यक्ष पडिला ॥ ३१॥ सपी वेढिलें चंदनासी । निधानाआड विवसी। नाना कळा देवासी। आड तैशा ॥ ३२ ॥ सांडून देव सर्वज्ञ । नादामध्ये व्हावें मग्न । तें प्रत्यक्ष विघ्न । आडवें आलें ॥ ३३ ॥ येक मन गुंतलें स्वरी । कोणे चिंतावा श्रीहरी । बळेचि धरोनियां चोरीं। शिश्रषा घेतली ॥ ३४॥ करितां देवाचे दर्शन । आडवें आलें रागज्ञान । तेणें धरूनियां मन । स्वरामागें नेलें ॥ ३५ ॥ १ भरतो. २ अन्य, ३ भूत, हडळ.