पान:रामदासवचनामृत.pdf/152

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

531 साक्षात्कार. - - - SNN तो जनीं दिसतो परी वेगळा । वर्ततां भासे निराळा। दृश्यपदार्थ त्या निर्मळा । स्पर्शलाचि नाहीं ॥ ३१ ॥ .... होती. दा. ७. १०, ७-३१. ६३. “ साधन सोडिता होये । मुक्तपणे बद्ध." मी तों ब्रह्मचि जालों स्वतां । साधन कोण करील आता है. ऐसे मनी कल्पूं जातां । कल्पनाचि उठे ॥ ५४॥ ब्रह्मीं कल्पना न साहे। तेचि तेथे उभी राहे। . तयेसि शोधून पाहे । तोचि साधु ॥ ५५॥ निर्विकल्पासी कल्पावें । परी कल्पिते आपण न व्हावें । मीपणासी त्यागावें । येणें रिती ॥ ५६ ॥ या ब्रह्मविद्येच्या लंपणी । कांहींच नसावें असोनि । दक्ष आणी समाधानी । तोच हे जाणे ॥ ५७ ॥ जयासी आपण कल्पावें । तेंचि आपण स्वभावें। तेथें कल्पनेच्या नांवें । सुन्य आलें ॥ ५८॥ पदींहून चळों नये । करावे साधन उपाये। तरीच सांपडे सोये । अलिप्तपणाची॥ ५९॥ राजा राजपदी असतां । उगीच चाले सर्व सत्ता। साध्यचि होऊन तत्वता । साधन करावें॥ ६०॥ साधन आले देहाच्या माथां । आपण देह नव्हे सर्वथा। ऐसा करूनि अकर्ता । सहजचि जाला ॥ ६१ ॥ देह आपण ऐसें कल्पावें । तरीच साधन त्यागावें । देहातीत अस्तां स्वभावें । देह कैंचा ॥२॥ . १ लपंडाव.