पान:रामदासवचनामृत.pdf/16

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना निघाल्या असाव्या असे वाटते. दासबोध ग्रंथाची मूळ कल्पना 'एकवीस समासी' अगर ‘जना दासबोध' या नांवानें जो ग्रंथ प्रसिद्ध आहे त्यांत आहे. या जुन्या दासबोधांत व हल्लीच्या आपल्या दासबोधांत पुष्कळ प्रकरणे सारखीच आहेत. त्यांचा जिज्ञासूंनी अवश्य अभ्यास करावा. यानंतर सत्तर समासांमध्ये दासबोध वाढविण्याची कल्पना रामदासांस राचली असावी, व त्याबरहुकूम हल्लीच्या दासबोधाचे पहिले सात दशक लिहिले गेले असावे. दासबोधांतील दशक ७ समास १० यांतील ४२ वी ओंवी "सरली शब्दाची खटपट । आला ग्रंथाचा शेवट । येथे सांगितलें पष्ट सद्गरुभजन ।।" या व पुढील ओव्यांवरून प्रथम दासबोधाची समाप्ति येथेंच करण्याचा रामदासांचा विचार असावा असे दिसते. नंतर प्रसंगानुरूप वाढत वाढत जाऊन इतर समासांची त्यांत भर पडून हल्लींचा दासबोध ग्रंथ झाला आहे. दासबोध ग्रंथ लिहिण्यास दहा वर्षे लागतील असा संकल्प करून रामदास शके १५७६ मध्ये शिवथरच्या घळीत जाऊन बसले असें दिवाकर गोसावी यांनी चाफळहन बहिरामभट यांस लिहिलेले पत्र उपलब्ध आहे त्यावरून दिसते. यावेळी दासबोध ग्रंथ लिहिण्यास सुरुवात झाली असावी. दासबोधांतील दशक ६ समास ' हा शके १५८१ मध्ये लिहिला आहे असे त्यांतील सातव्या ओंवीच्या " च्यारि सहस्र सातशें साठी । इनुकी कलयुगाची राहाटी" या अंतःपुराव्यावरून सिद्ध होते. शिवाय अठराव्या दशकांतील ६ वा समास की ज्यांत रामदासांनी शिवाजीस अफझुलखानाचे भेटीचे वेळी उपदेश केला आहे असे दिसतें तोही शके १५८१ मध्ये लिहिला गेला असावा. एकंदरीत शके १५८१ हें साल दासबोधग्रंथाच्या रचनेत महत्त्वाचे आहे असे म्हणण्यास हरकत नाही. दासबोधाच्या दोन मूळ प्रती आपल्यास उपलब्ध आहेत. डोमगांव मठांतील कल्याणांनी लिहिलेली व रा. देवांनी प्रसिद्ध केलेली एक प्रत, व शिरगांव मठांतील कल्याणांचे बंधु दत्तात्रय यांनी लिहिलेली व ग्वाल्हेरीस रा. पांगारकर यांस उपलब्ध झालेली शके १६०६ मधील दुसरी प्रत. या दोन्ही प्रती शोधून काढण्याबद्दल व रामदासांचा मूळ दासबोध आपल्यास दिल्याबद्दल रा. देव व पांगारकर यांचे जितके आभार मानावे तितके थोडेच आहेत. रा. देवांनी आपल्यास समर्थसेवेस वाहूनच घेतले आहे. मूळप्रतीबरहुकूमच त्यांनी समथांचे जे ग्रंथ