पान:रामदासवचनामृत.pdf/197

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५४ रामदासवचनामृत-संकीर्ण ग्रंथ. [८५ सर्वस्वाची आस तुटे । तरीच सगुणमूर्ति प्रगटे। दुःख संसारींचें फिटे । एकसरा ॥२१॥ जु. दा. ७. १३-२१. . ८६. प्रपंचपरमार्थ. गृहासी आग लागली । देखोनि कां बोंब केली। लोकांची मांदी मेळविली । आगी विझवाया कारणें ॥ तैसी परमार्थी बोंब मारावी । कांहीं काढाकाटी करावी । हळू हळू सोडवावी । मिठी प्रपंचाची ॥ प्रपंचधुडका पेटला। मध्ये परमार्थ जळूनि गेला। ऐसें देखोनि तुम्हांला । कैसे बरे वाटते॥ मुक्ताफळ आणि दिव्यांबर । नाना वस्तूंचे भांडार। भस्म करूनि वैश्वानर । विझोनि जाई जेंवीं ॥ तैसा प्रपंच हा परमार्थासी । जाळोनि भोगू नेदी आपणांसी। आयुष्य गेलियां प्राणियासी। विमुख होय ॥ जरी हा प्रपंच शाश्वत जाणतो । तरी आम्ही यासीच धरितों। हा अशाश्वत म्हणोनि रडतों। तुम्हां भोंवतीं ॥ तुम्हीं कैसे रे परमार्थी । परघात आणि अपस्वार्थी। डोळे झांकूनि दोहीं अर्थी । नागवलेत की रे॥ जु. दा. ११. ५४-६०. ८७. अनुभव सांगू नये. आताही जयास वाटे भेटावें । रामें मज सांभाळीत जावें। ऐसें दृढ घेतलें जीवें । तरी ऐका मी सांगेन ॥ ३७॥ १ अमि, वणवा. .