पान:रामदासवचनामृत.pdf/240

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९७ ऐतिहासिक. तीर्थक्षत्रे मोडिलीं। ब्राह्मणस्थाने भ्रष्ट जाली। सकळ पृथ्वी आंदोळली। धर्म गेला ॥७॥ देवधर्मगोब्राह्मण । यांचे करावया संरक्षण। हृदयस्थ जाला नारायण । प्रेरणा केली ॥ ८॥ . उदंड पंडित पुराणिक । कवीश्वर याज्ञिक वैदिक । धूर्त तार्किक सभानायक । तुमचे ठायीं ॥९॥ या भूमंडाळाचे ठायीं । धर्म रक्षी ऐसा नाहीं। महाराष्ट्र धर्म राहिला कांहीं । तुम्हांकरितां ॥ १० ॥ आणिकही धर्मकृत्ये चालती। आश्रित होऊनी कित्येक राहती धन्य धन्य तुमची कीर्ति । विश्वीं विस्तारली ॥ ११ ॥ कित्येक दुष्ट संहारिले । कित्येकांस धाक सूटले। ... कित्येकांस आश्रय जाले । शिव कल्याणराजा ॥ १२ ॥ तुमचे देशी वास्तव्य केलें । परंतु वर्तमान नाही घेतलें। ऋणानुबंधे विस्मरण जालें । काय नेणूं ॥ १३ ॥ सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ती । सांगणे काय तुम्हांप्रती। धर्मस्थापनेची कीर्ती । सांभाळली पाहिजे ॥१४॥ उदंड राजकारण तटले । तेणें चित्त विभागलें। प्रसंग नसतां लिहिलें । क्षमा केली पाहिजे ॥१५॥ ११४. क्षात्रधर्म. अल्पस्वल्प संसारधर्म । मागां बोलिलों राजधर्म । आतां ऐका क्षात्रधर्म । परम दुर्लभ जो॥१॥ जयास जिवाचे वाटे भय । त्याने क्षात्रधर्म करूं नये । कांही तरी करूनि उपाये । पोट भरावें ॥२॥