पान:रामदासवचनामृत.pdf/249

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रामदासवचनामृत-संकीर्ण ग्रंथ. [ ११८ जन्म झाला झाला देव वंशा आले। उपासना चाले राघवाची ॥ २३ ॥ राघवाची भक्ति सुखाची विश्रांति।। पितयाची शांति झाली पुढें ॥ २४ ॥ पुढे ज्येष्ठबंधु न सांगेंचि कांहीं। सुखें देवालयीं निद्रा केली ॥ २५ ॥ निद्रा केली तेथें श्रीरामें उठवूनी। तोचि मंत्र कानी सांगितला ॥ २६ ॥ सांगितला बोध रामीरामदासा। गुरूच्याहि वंशा निरोपिलें ॥२७॥ ११९. हनुमंत आमुची कुळवल्ली. हनुमंत आमची कुळवल्ली । राममंडपी वेला गेली। श्रीरामभक्तीने फळली । रामदास बोले ॥१॥ आमुचे कुळी हनुमंत । हनुमंत आमुचे दैवत । तयावीण आमुचा परमार्थ । सिद्धीतें न पवे की ॥२॥ साह्य आझांसी हनुमंत । आराध्य दैवत श्रीरघुनाथ ।। गुरु श्रीराम समर्थ। उणें काय दासासीं ॥ ३ ॥ दाता एक रघुनंदन । वरकड लंडी देईल कोण। हे सोडोन आम्ही जन । कोणाप्रति मागावें ॥४॥ ह्मणोनि आम्ही रामदास । रामचरणीं आमुचा विश्वास । कोसळोनि पडो रे आकाश । आणिकाची वास न पाहूं ॥५॥ स्वरूपसांप्रदाय अयोध्यामठ । जानकी देवी रघुनाथ दैवत । मारुती उपासक नेमस्त । वाढविला परमार्थ रामदासीं ॥६॥ १ वाट.