पान:रामायणनिरीक्षण.pdf/१०६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कृपया पुस्तके जपून वापरा प्रकरण ७ वें. ९७ करून शिवलिंगाचें दर्शन घेण्याचा क्रम होता; तेव्हां तिनें त्या समु- द्रांतील ( लंका ) नगरींतील राक्षसास विचारिलें – “येथें शिवलिंग कोठे आहे ? " असें त्या विद्याधरकन्यकेने त्या राक्षसास विचारितांच त्यानें तिला पातालांत नेऊन तेथील हाटकेश्वर लिंग दाखविलें व तीस दर सोमवारीं तो तेथें नेत असेः- इत्युक्तः स तया दैत्यः पाताले हाटकेश्वरम् । तस्याः संदर्शयैदेवि, स्वालयादयनं तथा || तस्मिन् पाताललोके तु ये पातालनिवासिनः । ते सर्वे हाटकेशस्य प्रदोषे दर्शने स्थिताः || यांत, राक्षसानें हिंदुस्थानांतील एकादें शिवलिंग न दाखवितां पाताळांतील हाटकेश्वर लिंगच कां दाखवावें व तिकडेच कां तिला न्यावें, असा प्रश्न उद्भवतो; याचें उत्तर आमच्या मतें तर हेंच आहे कीं, पाताल हें राक्षसांचें मूळस्थान असून तेथील आपले वैभव दाखविण्यासाठी राक्षसानें विद्याधरकन्येस तिकडे नेलें असावें. इकडे पसरले; ( ३ ) स्कंदपुराणाच्या केदार खंडांतील जी वृत्र व बलि यांची विस्तृत गोष्ट मागें दिली आहे, तींत तर ते पातालाहूनच प्रथम येऊन समुद्रातील एका बेटांत राहिले व हिंदुस्थानांत व नंतर पराभव झाल्यानंतर ( आपल्या स्वस्थानी म्हणजे ) पातालास परत गेले असे स्पष्ट वर्णन आहे. यावरून, पाताळच राक्षसांचें मूळचें निवासस्थान, असे मानण्यास बळकटी येते. ( ४ ) रामायणांत (४-१-१७ ) लक्ष्मण रामास ह्मणतो:- यदि गच्छति पातालं ततोऽभ्यधिकमेव वा । सर्वथा रावणः तात न भविष्यति राघव || १ असे शिव पार्वतीस सांगत आहे. ७