पान:रामायणनिरीक्षण.pdf/१४३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रामायणनिरीक्षण. णाचे रामाश्वमेधांत वरील कांडश: ( रामायणाचें ) सार दिलें, त्या- वेळीं चालकांडांत भरताच्या नंदिग्राम येथील वासापर्यंत मज- कूर होता; यावरून रामाश्वमेघांतील हें कांडशः सार सातव्या शत- काहून बरेंच प्राचीन दिसतें. बालकांड व अयोध्याकांड मिळून एकच कांड पूर्वी असल्याविषयीं दुसरा कांहीं पुरावा मिळतो कीं काय हें पाहणें जरूर आहे. असो. रामाश्चमघपर्व हें यामुळे निदान तिसऱ्या किंवा चवथ्या शतका इतकें तरी जुनें धरावें लागतें; कदाचित् तें याहूनहि प्राचीन असू शकेल; पण तसें गृहीत धरण्यास आपल्या- जवळ कांहीं पुरावा पाहिजे. आग्निवेश्य रामायणांतील उतारा. S परिशिष्ट २ रें. - ' रामायण तिलक 'नामक रामकृत टीकेच्या अनुसंधानांत एके ठायीं आग्निवेश्य रामायणांतील ह्मणून एक उतारा दिला आहे. [ युद्ध- कांड, सर्ग ११० नंतरची टीका पहा ]. तो महत्त्वाचा वाटल्यावरून येथें मुद्दाम परिशिष्टरूपानें दिला आहे. टीकाकार म्हणतो:- आग्निवेश्यरामायणमिति प्रसिद्धग्रंथेषु । राम: पंचदशे वर्षे षड्वर्षामपि मैथिलीम् । उपयेमे त्वयोध्यायां द्वादशाब्दान् उवास सः ॥ १ ॥ सप्तविंशतिमे वर्षे वनवासमकल्पयत् । अष्टादश तु वर्षाणि सीतायास्तु तदाऽभवन् ॥ २ ॥ त्रिरात्रं उदकाहारः चतुर्थेऽन्हि फलाशनम् |