पान:रामायणनिरीक्षण.pdf/१९३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८४ रामायणनिरीक्षण. ( ८ ) रामायणांत ( सुंदर कांड, अ. ९३ मध्यें ) ज्याप्रमाणे रामाला शर मारून समुद्रास वठणीस आणाव लागलें आहे, त्या- प्रमाणें यांत करावें लागलें नाहीं. सेतु बांधून देण्यास समुद्र तेथें लागलाच तयार झालेला आहे. ( ९ ) रामायणांतल्या ( सुंदर कांड ९२ अ. ) प्रमाणें यांत बिभी- पण हा रामाकडे सेतु बांधण्याच्या पूर्वी येत नसून नंतर येतो. ( १० ) कुंभकर्णाचा वध येथें रामाकडून न होतां लक्ष्मणाकडून झाला आहे असे म्हटले आहे. ( १ १ ) इंद्रजितानें निकुंभिलेंत जे दोन यज्ञ केले ( रामायण; ६-१९-३९ व ५२ - १८) त्यांचा यांत उल्लेख नाहीं, ( १२) इंद्रजितानें रामलक्ष्मणांस मूच्छित केल्याची गोष्ट ( रा. ६-२४-२ व ५३; यांतल्याप्रमाणे दोन वेळ आढळत नसून एकदांच आढळते. A ( १३ ) संजीवनी वनस्पति मारुतीने हिमालयांतून आणिल्याचा उल्लेख ( रामा. ६-५३ व ८३ यांतल्याप्रमाणें ) रामोपाख्यानांत नसून, ती सुग्रीवानेंच विशल्यकरणीने त्यास शुद्धीवर आणिलें असें वर्णन आहे. 'विशल्यौ चापि सुग्रीवः क्षणेनेतौ चकार ह । विशल्यया महौषध्या दिव्यमंत्रप्रयुक्तया' ( १४ ) सीता अग्निशुद्ध झाल्याचें वर्णन नसून ती शुद्ध अस- ल्याबद्दल फक्त देवांच्या (आकाशवाणीवरून) साक्षीवरच तेथें काम भागविण्यांत आलेले आहे. उत्तरकांडांतहि या अग्निशुद्धीचा उल्लेख मसून देवांच्या साक्षींचाच उल्लेख असल्यामुळे अग्निशुद्धीचा भाग उत्तरकांडाच्या वेळींहि रामायणांत नसावा. त्यानंतरच हा अद्भुत भाग यांत घालण्यांत आला असावा.