पान:रामायणनिरीक्षण.pdf/२१२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

• परिशिष्ट १३ वें. २०३ साधे उल्लेख येते ना. तेव्हां, रामायणाला सद्य:स्वरूप मिळाल्यापूर्वीच वरील दोन्हीं आख्याने लिहिली गेलीं असें वाटतें. ( २ ) विश्वामित्रांनी १० हजार वर्षे तप केलें, असा प्रचलित समज आहे; तो रामायणाच्या सद्य:स्वरूपावरूनच आहे; पण बुद्ध- चरितांत विश्वामित्रानें १० च वर्षे तप केल्याचा स्पष्ट उल्लेख आहे.. या काव्याचा कर्ता अश्वघोष हा इ. पू. च्या पहिल्या शतकापासून इ. स. च्या पहिल्या किंवा दुसऱ्या शतकापर्यंत होता. याच्या अनेक उल्लेखांवरून पहातां यास भारत - रामायण हे ग्रंथ माहीत होते असें स्पष्ट दिसतें. तेव्हां याच्या वेळी विश्वामित्रानें १० हजार वर्षे तप केलें अशी समजूत असती तर यानें तसा उल्लेख केला असता; पण. यानें फक्त विश्वामित्रानें १० वर्षे तप केल्याचा याप्रमाणें उल्लेख केलेला आहे :- - विश्वामित्रो महर्षिश्च विगाढोऽपि महत्तपः | दशवर्षाण्यरण्यस्थो वृताच्याऽप्सरसा हृतः । बुद्धचरित, ४-२० ॥ ( ३ ) शिवाय कृतयुगांत हजार वर्षीचे एक वर्ष धरिलें जात असे, असा स्पष्ट उल्लेखहि आनंदरामायणांत आढळतो; यावरून तर अतिशयोक्तिकर्त्यांनीं कृतयुगांतील गोष्टी-वर्षीचें संबंध येतील त्या ठायीं त्यांस १००० नीं गुणून सांगितलेल्या आहेत, याबद्दल. संशयच रहात नाहीं. आनंदरामायणकार हाणतात कीं:- सहस्रवर्षैर्विज्ञेयं श्रेष्ठं वर्षे कृते युगे ॥ शतवर्षैश्च त्रेतायां द्वापरे दशवर्षजम् । कलेर्मानेन बोद्धव्यं शून्य हासञ्त्रिविक्रमात् || -- आ. रा. १-५-१३व १३३-