पान:रामायणनिरीक्षण.pdf/२१६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

टीपा. 11 JAN 1994 ३ अहीनगु – वृक - पारियात्र दल शल- उक्थ- वज्रनाभ - शंखनाभ-- व्युषिताश्च—विश्वसह—–हिरण्यनाभ-पुप्य - ध्रुवसंधि ( पौष्य ) - सुदर्शन - अग्निवर्ण-शीघ-मरु-सुगवि - अमर्ष - महस्वाज् - विश्रुतवान् व बृह- इल याप्रमाणे ) सुमारें २९।३० पिढ्या झालेल्या आहेत. बृह- इल भारतीय युद्धांत मरण पावल्याविषयीं अनेक पुराणांतून उल्लेख आहेत; पण कोसल देशच्या हिरण्यनाभाविषयीं पुराणांत म्हटलेलें आहे कीं, हिरण्यनाभस्ततो महायोगीश्वरो जैमिनिशिष्यो यतो याज्ञवल्क्यो योगमत्राप || ( वि. पु. ) यावरून हा हिरण्यनाभ, योगीश्वर असून जैमिनीचा शिष्य व योगविद्येत याज्ञवल्क्याचा गुरु होय हे कळून यतें; याचा पुत्र पुष्य व तत्पुत्र ध्रुवसंधि ( पौप्य ) होय. याच पौप्याचा उल्लेख भारताच्या प्रारंभी ( पांडवांनंतरच्या ) जनमेजयाच्या समकालीन म्हणून उल्लेख येतो; यावरून हिरण्यनाभ पुष्य व ध्रुवसंधि ( पौप्य ) हेच सूर्यवंशांतील राजे पांडवकाळीं समकालीन असावेत असे वाटतें. मग त्यापुढील ९ पिढ्यांनंतरचा बृहद्दल पांडवकालीन कसा ! मला वाटतें, ही सूर्यवंशाचीच पण दुसरी एकादी शाखा असावी. यावरून रामचंद्रांपासून पांडवांपर्यंत १९-२० पिढ्या गेल्या की २९-३० पिढ्या गेल्या हे ठरविणे कठिण आहे; तथापि, जनकवशांतील सरिध्वजापासून बहुलाश्वापर्यतीह ३० | ३१ च पिढ्या आहेत हीहि गोष्ट लक्षांत घेतली पाहिजे. o आतां याप्रमाणें पिढ्यांवरून काळ काढण्याची पद्धत रा. ब. वैद्यां- सहि मान्य आहे. ते रामायगाचें कोडें या इंग्रजी पुस्तकांत लिहि- तात कीं: – ( पृ. २०१) “ If 39 ( ? 29 ) kings intervened between राम and कृष्ण, as Mr. Abhyankar states on the authority of