पान:रामायणनिरीक्षण.pdf/२३५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रामायणनिरीक्षण. - परमेश्वराजवळ प्रार्थना आहे - रा. गोविंद त्र्यंबक चांदोरकर, बी. ए. माजी ' प्रभात ' मा. पु. चे संपादक, धुळे. रा० काळे व त्यांचे ग्रंथ. १पुराणनिरीक्षण २भारतीय रसायनशास्त्र. हे ग्रंथ आमचे विद्वान व शोधक मित्र वैद्य त्र्यंबक गुरुनाथ काळे यांजकडून अभिप्रायार्थ येऊन वरेच दिवस झाले. रा. रा. काळे यांनी चिकित्सक व तारतम्याच्या दृष्टीनें पुराणग्रंथांचा अभ्यास केला असून 'पुराणे धर्मनिश्चयः 'हे त्यांनी त्यांचें सार योग्य प्रकारें काढले आहे. पुराणग्रंथांविषयीं ग्रंथकाराची पूज्यबुद्धि असून त्यांनी आधुनिक पद्धतीनें कालगणना श्लोकसंख्या, पौर्वापर्य इ० मुद्यांचं विवेचन केले आहे. रा. काळे यांची विवेचनपद्धति मार्मिकपणाची असून भाषेत सौलम्य व प्रागल्भ्य हे गुण स्पष्ट दिसतात. कांहीं ठिकाणीं कांहीं वाचकांचा त्यांच्याशीं मतभेद होण्याचा संभव आहे; कदाचित् त्यांचें मत कोठें चुकीचेंहि असू शकेल; पण त्यांचे विषय- विवेचन प्रामाणिक बुद्धीनें केलेले असून त्यांच्या पोटांत खऱ्या विद्वा- नाच्या ठिकाणी असणारी ज्ञानतृष्णा अलौकिक आहे यात शंका नाहीं. रा. काळे पदवीधर असते तर त्यांच्या शोधकपणाचे आमच्या विद्वत्समुदायांत जास्त कौतुक झालें असतें, पण एवढे निश्चित आहे कीं, रा. काळे यांच्या इतका ज्ञानलोलुप, विद्वान् व शोधक पंडित पदवीधरांत शोधू गेल्यास एकाददुसरा असेल नसेल! कै. न्या. रानडे म्हणत असत कीं ' It is the privilage of a Brahmin to be poor' म्ह. दरिद्री असणें हा ब्राह्मणाचा खन्या विद्याभिलाषी पुरुमाचा हक्क आहे, हे वाक्य रा. काळे यांची गृहस्थिति व तिला न