पान:रामायणनिरीक्षण.pdf/२३९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२ रामायणनिरीक्षण. होत गेलें, प्रथम व्यासांनीं पुराणांचे रूपांतर कर्से केलें, व्यासांनंतर पुराणांस चालन कसकसें व कितीदां मिळालें, याविषयीं रा. काळे यांनी यापुढें चांगलें विवेचन केलेले आहे. शेवटीं पुराणांचा हेतु वेदार्थ प्रकट करण्याचा किंबहुना धर्म सांगण्याचा आहे, असें रा. काळे यांनी दाखविलें आहे x x विक्रमोत्तर पुराणांस प्रथम चालन ( मिळून त्यांस हल्लींचें स्वरूप ) मिळालें ही गोष्ट पुरणां- तील वचनांवरूनच त्यांनी सिद्ध केली आहे. एकंदर १८ पुराणे मिळून ४ लक्ष ग्रंथ, महाभारत एक लक्ष, व रामायण २४००० ग्रंथ असा सवापांच लक्ष धर्मग्रंथ होय असें सांगणारें एक महत्वाचे वचन " एवं सपादाः पंचैते लक्षा मयें प्रकीर्तिताः । " रा. काळे यांनी दाखविलेले आहे. अठरा पुराणे मिळून चार लक्ष- म्हणजे एक एक पुराण सरासरीनें २२००० च पडतें. मूळ अठरा पुराणें १२-१२ हजारांची असे सांगणारें दुसरे एक वचन भविष्य पुराणांतून रा. काळे यांनी दाखविलें आहे. याप्रमाणें ही पुराणांची दुसरी आवृत्ति व प्रथम वृद्धि होय; यानंतर पुराणांची तिसरी आवृत्ति ह्मणजे हल्लीं उपलब्ध असलेली पुराणें हीं पांचव्या किंवा साहाव्या ख्रिस्ती शकांतील आहेत हें भविष्यद्राजाच्या वर्णनावरून त्यांनी ठरविलें आहे तें योग्य आहे. इ. स. ४०० च्या सुमारास ब्रम्हांड ऊर्फ वायु पुराणांत भविष्याचा भाग नव्हता हा महत्त्वाचा शोध काळे यांनी या प्रकरणांत दिला आहे. असो. रा. काळे यांनीं शोधक व ऐतिहासिक दृष्टीनें काढलेलीं वरील निगमनें बहुतेक सर्वोस मान्य होतील व तीं चांगलीं साधार आहेत असे म्हणण्यास प्रत्यवाय नाहीं. x x दुसऱ्या प्रकरणांत काळे यांनी प्रत्येक पुराणाविषयी सविस्तर माहिती दिली आहे. रा.