पान:रामायणनिरीक्षण.pdf/२४३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६ रामायणनिरीक्षण म्हणता येईल. पण ही गोष्ट रसशाळेत प्रयोगानें शास्त्रज्ञांसमोर प्रत्यक्ष सिद्ध करून दाखवितां येईपर्यंत तिला शास्त्रीय सिद्धांताचें स्वरूप येणार नाहीं. असो; एकंदरींत आर्यवैद्यकाचा इतिहास, चरकादि आयु प्रवर्तक ग्रंथकारांचा काल व रसायनशास्त्रावरील आर्य वाङ्म- याचें स्वरूप समजून घेऊं इच्छिणाऱ्या प्रत्येक गृहस्थाचे व विशेषतः सर्व वैद्याचे आश्रयास रा. काळे यांचा हा ग्रंथ पूर्णपणें पात्र आहे. केसरी- [ - ता. ८।४।१९१३ -- भारतीय रसायनशास्त्र - आमचे मित्र व इकडील भागांत बरेच प्रसिद्ध असलेले लेखक रा. त्र्यंबक गुरुनाथ काळे, यांनी सुरू केलेल्या पुराणशोधकग्रंथमालेतील हा दुसरा ग्रंथ होय. रा. काळे यांचा व्या- संग दांडगा असल्यामुळे त्यांची ही कृति चांगली यशस्वी झाली आहे हे नमूद करण्यास आम्हांस संतोष वाटतो. या महत्वाचे ग्रंथा- चर विस्तृत अभिप्राय येणें वाजवी आहे; पण 'विजया' च्या छोट्या स्वरूपांत तसें करतां येणें अशक्य आहे. या ग्रंथाची लहानमोठी ४४ प्रकरणें असून त्यांमध्यें रा. काळे यांनी आपल्या इकडील रसा- यनशास्त्राची त्यांना उपलब्ध झालेली सर्व माहिती चांगली, गोड भाषेत, संगतवार दिली आहे. रसविद्येविषयों नवीन शोध व प्रयोग करून पहाण्याला प्रस्तुतचा प्रयत्न हा जितका उपयुक्त आहे, तित- कोच शुद्ध रसायनशास्त्राचे दुर्मिळ असलेले ग्रंथ शोधून काढण्याला यांतील माहिती मार्गदर्शक होणार आहे. या ग्रंथाची पृष्ठे २१४ असून किंमत १॥ रुपाया आहे. ही किंमत माफक आहे. यांत शंका नाहीं. या ग्रंथाचे हिंदींत व कानडींतही भाषांतर झालें आहे हे लक्षांत वा- गवून महाराष्ट्र याला चांगला आश्रय देईल अशी आशा आहे.