पान:रामायणनिरीक्षण.pdf/६२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रामायणनिरीक्षण. ५३ अभ्यंकरांनी दाखविलेली आहे. मींहि पण जातां जातां एथें एक उदाहरण दाखवितों. वरील ४२ व्या श्लोकांत काव्य केलें लणून झटलें आहे; वरील ४१ व्या श्लोकांत वाल्मीकि अझून विचार करीत आहे. पुढील सर्गाचा ( ३ या ) पहिला लोक असा आहे :- श्रुत्वा वस्तु संमग्रं तद् धर्मार्थसहितं हितम् । - व्यक्तं अन्वेषते भूयः यद् वृत्तं तस्य धीमतः ॥ १.३.९ या व पुढील श्लोकांत वाल्मीकी अझून साधनें जमविण्याच्या खटपटींत आहे. मध्येंच ४२ व्या श्लोकांत सांगितल्याप्रमाणें वाल्मीकि इतक्यांत चरित्र कोठून करणार? दुसऱ्या सर्गाच्या ४१ व्या श्लोकाचा संबंध, तिसऱ्या सर्गातील पहिल्या लोकाशी जमतो, यावरूनहि ४२ वा दीर्घवृत्ताचा श्लोक एथें अनर्थक व जास्तीचा आहे इतकेंच नव्हें, तर कथानुसंधानास विरुद्धहि आहे, असेच कळून येईल ! असो. तिसऱ्या सर्गातील वरील पहिला श्लोक रामायण काव्यरचनेच्या • इतिहासांत अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचा सरळ मराठींत अर्थ असा आहे :- - “ तें धर्मार्थसहित व कल्याणकारक असे समग्र कथानक ( वस्तु ) ( नारदाकडून वाल्मीकीने) ऐकून, पुनः त्यानें त्या धीमान् (रामाच्या ) पुरुषाच्या व्यक्त (चारलोकांस ठाऊक असण्या- जोगें किंवा असलेलें ) अशा वृत्ताचा शोध करण्यास सुरवात केली. " व्यावरून रामचरित्राचीं इतर बरींच साधनें- जितकीं त्यास मिळणें शक्य होतीं तितकीं - वाल्मीकीने मिळविलीं अर्से उघड होते. पण हा श्लोक पुढील श्लोकांशीं ऐतिहासिकदृष्ट्या विसंगत असून काव्य- दृष्ट्या सुसंगत आहे:- १ त्यांचा वाल्मीकिरामायण हा निबंध पहा. --