पान:रामायणे भाग पहिला.pdf/४७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बालकांड.] ९. मंत्ररामायण. मग वाल्मीकिमुनीश्वर, निजशिष्यजनासमेत, तमसेला । माध्यंदिन नियमार्थ स्वधर्मनिष्ठ, प्रबुद्ध, तो गेला. ॥ जगतीसुर तो, जाउनि तमसातीरीं, स्मरेषुविद्धातें । क्रौंचखगातें पाहे, निजपत्निप्रीतिपाशबद्धातें ॥ यमतुल्यें निष्करुणें, रति करितां, क्रौंच तो निषादानें । वधितां, करुणाब्धि द्विज वदला तेथें असें विषादानें ॥ रागें वदतां, झाली प्रकट च्छंदोमयी अशी वाणी; । तेव्हां विस्मित मुनि तो नियम करुनि हेंच मानसी आणी ॥ मनन करी मुनिवर तो; त्याच्या स्थानासि येउनी धाता । सांगे, 'नारदकथित प्रभुचरित वदें' म्हणोनि वरदाता ॥ 'जगदीशचरित वर्णी, तच्छ्रवणें सर्व तरतिल प्राणी; । यास्तव वाल्मीके ! तुज म्यां हे छंदोमयी दिली वाणी ॥ यक्षवरानुजरिपुचें अतिप्पूताचरित नैकैपद्यांहीं । १० हृद्यांहीं वर्णावें; त्वत्कृति नमिजेल ते सुविद्यांहीं ॥ जलजोद्भव तो ऐसें वदोनि जातां, तदीयवरदानें । रामायणाख्य रचिलें काव्य मुनीनें, सुखप्रकरदानें ॥ 'यश विभुचें पढवावें कवणासि ?" म्हणे 'बहुश्रुतासि' कवी; । तों नृपसुत कुशलव तो, कुशल विलोकूनि, त्यांसि हें शिकवी. ॥ ११ रात्रिदिवस मधुरस्वर इतस्ततः प्रीतियुक्त ते" गाती; । तें ऐकुनि, रघुवीरें नेले स्वसभेसि बंधु सांगाती ॥ मेणिमयभद्रासनगत राम वजनासि काव्य आयकवी; । त्यांसि म्हणे, 'तें गा हो ! जें वदला सर्वविप्रराय कैवी.' ॥ ""श्री रघुनाथनिदेशें कथिता झाला असें कैवीन मुनी; । कुशलव कुशलवचनपटु गाती, मुधिला मनीं नमुनी ॥ ४१ ३ ४ ५ ६ ८ ९ १२ १४ १. नदीविशेष २. ब्राह्मण, ३. कामबाणानें ताडित अशा. ४. वेदरूप किंवा श्लोकरूप. ५. ब्रह्मा ६. यक्षांचा स्वामी जो कुत्रेर त्याचा कनिष्ठ बंधु रावण त्याच्या रिपूचें म्ह० रामाचें. ७. अनेक लोकांहीं. ८. सुंदरांहीं. ९. मुखसमूह देणारानें १०. इकडेतिकडे. ११. कुशलव १२. रत्नखचित सिंहासनस्थ १३. वाल्मीकि १४. श्रीरामाच्या आज्ञेनें. १५. कविश्रेष्ठ १६. गुरूच्या पायांला. ६