पान:रायगड किल्याचें वर्णन.pdf/५४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ५० )


लोकांस दोष दिला आहे. तो आपले पुस्तकांत ह्मणतो:-
 No man now cares for Shivaji over all those wide dominions which once owned him Lord and Master, acquired by so much blood and treasure and which he handed down with care to the Rajas of Kolapur, the Bhouslas of Satara and their Peshwas in Poona, not one man now contributes a Rupee to keep or repair the Tomb and temple of the founder of the Maratta Empire.

Book of Bombay.


तर मग असा प्रश्न सहज उत्पन्न होतो कीं, ही दुःखद स्थिति आजपर्यंत आह्मी राहूं दिली कशी?तर त्याचें कारण मला असें वाटतें कीं, महाराजांचे समाधीची व त्यांनीं स्थापिलेल्या शिवलिंगाची जी सांप्रत दैन्यदशा झाली आहे, तिचे संबंधानें खरी हकीगत राजेरजवाडे व मोठमोठाले लोकांपुढें आजपर्यंत कोणी ठेविली नव्हती, यामुळें असें होऊन गेलें. बाकी ही हकीगत जर लोकांस व राजेरजवाडे यांस कळती तर त्याज बाबद योग्ययत्न केल्याशिवाय कधीं राहिले नसते अशी माझी समजूत आहे. बरें, चला जें होऊन गेलें तें कांहीं मागें येत नाहीं. आतां तरी आपण त्याजविषयीं योग्य विचार करूं ह्मणजे आपलें सर्वांचे कर्तव्यकर्म केलें असें होईल.
 आतांच मीं रायगडावर जाऊन आलों व तेथें मीं माझे डोळ्यांनीं जी खरी स्थिति पाहिली त्याजवरून ही हकीगत पुस्तकरूपानें लिहून आपल्या सर्वांपुढे ठेवीत